ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

भव्य शोभा यात्रे सह रक्तदान शिबिराचे आयोजन

गेवराई प्रतिनिधी -: जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांच्या 893 व्या जयंतीच्या अनुषंगाने दि. 7 मे रोजी गेवराई येथील रेणुका देवी मंदिर येथे विरशैव समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.ही बैठक विरशैव समाजाचे अध्यक्ष सतीश आप्पा रुकर, अनिल आप्पा शेटे, शाम रुकर यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली. यामध्ये महात्मा बसेश्वर जयंती ची कार्यकरणी करण्याची निवड करण्यात आली.
जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीच्या कार्यक्रमा ची पुढील रूपरेषा ठरवण्यात आली. यामध्ये 12 तारखेला जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 893 वी जयंती गेवराई शहरात साजरी करण्यात येणार असल्या चा ठराव या बैठकीमध्ये ठरला तसेच या जयंतीची कार्यकारणी करण्यात आली
यामध्ये जगदज्योती महात्मा बसेश्वर जयंतीचे अध्यक्षपदी अजय रुकर , उपाध्यक्षपदी अनिकेत संभाहारे, सचिव पदी संदीप कापसे, कोषाध्यक्षपदी योगेश कापसे, सह कोषाध्यक्ष तर स्वागत अध्यक्ष गजानन कापसे, अनिकेत कापसे,सह सचिव, संघटक, सह संघटक, सल्लागार, सह सल्लागार प्रसिद्धी प्रमुख कैलास हातगुले, अमोल कापसे, वैजनाथ मिटकरी, सदस्य बसवराज मिटकरी, अनिकेत वडकर, विजय कापसे, श्रीनाथ सोसे, व शुभम संभाहारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.12 मे 2024 वार रविवार रोजी सकाळी 8 वा.जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांची 893 वी जयंती मिरवणूक रेणुका देवी मंदिर मेन रोड गेवराई येथून निघणार असून तहसील रोड पोलीस स्टेशन मार्गे शास्त्री चौक, माळी गल्ली, मोमीनपुरा, मार्गे पुन्हा रेणुका देवी मंदिरात या जयंतीचा समारोप कार्यक्रम होणार आहे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे या बैठकीमध्ये ठरवले आहे. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. बैठकीचे सूत्रसंचालन उमेश राजूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश मिटकर यांनी केले .

error: Content is protected !!