ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदे

आ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा

पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदे

जामखेड प्रतिनिधी;-अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघ, महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या प्रचारार्थ आ. राम शिंदे यांचा डोणगाव येथे आज दि.८ मे २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता गावातील ग्रामस्थांनी ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढून कॉर्नर सभा घेण्यात आली.

आ.राम शिंदे बोलताना म्हणाले कि, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे खा. सुजय विखे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे. ही निवडणूक मा. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची निवडणूक आहे. आज पर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली आहेत. आणि आणखी होतीलही. आपल्या वाडिवस्तीचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर पुन्हा एकदा खा. सुजय विखे पा. यांना निवडून आणायचे आहे .

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, रवि सुरवसे, सोमनाथ पाचारणे, सरपंच बापूराव ढवळे, सरपंच लहू शिंदे,सरपंच पांडुरंग उबाळे, अशोक महारनवर, नाना आढाव, राऊत मेजर, उपसरपंच अजित यादव, पोपट जमदाडे, राम पवळ, मा. सरपंच दत्ता भागवत, मा. सरपंच अर्जुन यादव, ग्रा. प. सदस्य आबा पोठरे, बिभीषण पवळ, रामेश्वर यादव मेजर, भाऊसाहेब यादव, गणेश यादव, बबन मोरे, बारकू धनवे, बाळासाहेब पवळ,अशोक यादव,सोमीनाथ मोरे, निलेश वारे, प्रशांत साळवाण,जालिंदर यादव, बुवासाहेब यादव,गणेश डोंगरे, सचिन सातव, बबन यादव, पांडुरंग पोठरे, विजय जमदाडे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपसरपंच अजित यादव यांनी केले, तर आभार पोपट जमदाडे यांनी मानले..

error: Content is protected !!