ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

लॉकडाऊन टळले पण नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार

  • 💥💥 *गुड इव्हिनिंग सिटी बिग ब्रेकिंग*

*लॉकडाऊन टळले पण नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार*

 

◆ जिल्हाधिकारी श्री राममूर्ती यांची गुड इव्हिनिंग सिटीला माहिती

बुलडाणा, 16 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः नुकतीच कोविड आढावा बैठक संपली असून अकोला जिल्ह्याप्रमाणे बुलडाण्यात तूर्तास कडक लॉकडाऊन करणार नसल्याचे जिल्हाधिकारी राममूर्ती यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले आहे. अर्थात मास्क घालणे, सोशल डिस्टनसिंग आणि वेळोवेळी हात धुणे या त्रिसूत्रीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जातेय की नाही, हे तपासून जे याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करू, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. मागील आठवड्याची सरासरी 10 टक्क्यांच्या वर आहे. सर्वांसाठी ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा नियोजन सभागृहात कोविड आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सर्व विभागप्रमुख तथा जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

 

■ लग्न समारंभात उसळणारी गर्दी तसेच लोकांचा रस्त्यावर अनावश्यक संचार चिंताजनक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यापुढे तहसीलदार, एसडीओ, मुख्याधिकारी तसेच महसूल यंत्रणा या बाबींकडे कटाक्षाने लक्ष देईल. तूर्तास शाळा महाविद्यालय बंद करण्याची गरज नाही परंतु सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क घालणे बंधनकारक आहे. अनावश्यक गर्दी करू नये. नियम न पाळणाऱ्यास दंड ठोठावला जाईल, असेही जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितले.

अकोला जिल्हाधिकारी यांनी काल, 15 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

 

अकोला येथे शाळा, महाविद्यालय पुन्हा बंद करण्यात आले असून तेथे मिरवणूक तसेच उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. अमरावती येथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुलडाण्यात सध्या लॉकडाऊन टळला असला तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या जिल्ह्याला लॉकडाऊन कडे घेऊन जात असल्याचे स्पष्ट आहे.

goodeveningcity

16 feb 2021. 15:00

■■■■■■■■■■■■■■

error: Content is protected !!