ब्रेकिंग न्युज
जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

करुणा धनंजय मुंडे म्हणतात, तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही ?

करुणा धनंजय मुंडे म्हणतात, तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही ?

🔸अशोक काळकुटे | संपादक

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे (करुणा शर्मा) यांनी उडी घेतली आहे. “जे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही?”, असा खणखणीत सवाल करुणा शर्मा यांनी फेसबुकवर केला आहे. “आम्ही न्याय मागतो, भीक नाही. पूजा चव्हाण यांची आत्महत्या की हत्या याची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे”, असंदेखील करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.

करुणा शर्मा यांनी जीवन जो सामाजिक संस्थेचे काही बॅनर फेसबुकवर शेअर केले आहेत. या संस्थेचं आपण महाराष्ट्र महिला अध्यक्ष असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्याचबरोबर संबंधित बॅनरवर पूजा चव्हाणला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. “आम्ही न्याय मागतो, भीक नाही”, असंदेखील बॅनरवर म्हटलं आहे.

करुणा धनंजय मुंडे नेमकं कोण आहेत?
करुणा शर्मा किंवा करुणा धनंजय मुंडे हे जाणून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला या प्रकरणाच्या अगदी खोलात जावं लागेल. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने गेल्या महिन्यात पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. रेणू शर्मा यांच्या आरोपांनुसार 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरु आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. करुणा शर्मा या तक्रारदार रेणू शर्मा यांच्याच मोठी बहीण आहेत.

धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट

रेणू शर्मा यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली. त्यांनी फेसबुकवर मांडलेल्या भूमिकेत रेणू शर्मा या तरुणीची मोठी बहीण करुणा शर्मा या महिलेसोबत परस्पर सहमतीने 2002 सालापासून संबंधात असल्याची कबूली दिली होती. त्याचबरोबर करुणा शर्मा यांच्यापासून आपल्याला दोन मुलंदेखील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबादारी आपण घेतल्याची त्यांनी सांगितलं होतं.

धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्टमध्ये रेणू शर्मा यांचा बलात्काराचा आरोप फेटाळून लावला आहे. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.

error: Content is protected !!