ब्रेकिंग न्युज
सत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधव

विवाहबाह्य प्रेम संबंध उघड होण्याच्या भीतीने तरुणाची निर्घृण हत्या ; विवाहित महिलेसह प्रियकराला अटक.

विवाहबाह्य प्रेम संबंध उघड होण्याच्या भीतीने तरुणाची निर्घृण हत्या ; विवाहित महिलेसह प्रियकराला अटक.

🔸अशोक काळकुटे | संपादक

नांदेड- विवाहबाह्य संबंधाची माहिती उघड करण्याची धमकी देणाऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे.
देगलूर तालुक्यातील कुडली या गावातील ही घटना आहे. या गावातील एका विवाहित महिलेचे एका अविवाहित तरुणासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते.
याबाबत गावातील आणखी एका व्यक्तीला माहिती होती. तो आपल्या विवाहबाह्य प्रेम प्रकरणाबाबत कुठे वाच्यता करेल या भीतीने त्याचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जोडप्याला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील पोलीस ठाणे मरखेल अंतर्गत येणाऱ्या मौजे कुडली येथे विवाहबाह्य संबंधाचा उलगडा करणाऱ्या एका २७ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मौजे कुडली येथील रहिवासी हानमंत पुंडलिक जाधव यांचा मुलगा जगदीश (वय २७) हा ०१ जानेवारीपासून घरातून निघून गेला. नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे ०६ जानेवारीला त्यांनी पोलीस ठाणे मरखेल येथे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

२५ फेब्रुवारीला कुडली शिवारात एका अनोळखी इसमाच्या डोक्याची कवटी आढळून आल्याची माहिती मरखेल पोलिसांना मिळाली. पोलीस ठाणे मरखेलचे सहपोली निरीक्षक आदित्य लोणीकर आणि पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चंदरबाई जाधव यांच्या शेतातील वाढलेल्या गवतात माणसाच्या अवयवाची काही हाडे, कपडे चप्पल आढळून आले. यावेळी पोलिसांनी जगदीश याचे वडील पुंडलिक जाधव यांना घटनास्थळी बोलावून घेतले. तेव्हा कपड्यावरुन त्यांनी आपलाच मुलगा असल्याची ओळख पटवली. त्यांनी आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली.

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्तवात पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली. तब्बल एक महिन्याच्या तपासात अखेर सत्य घटनेचा छडा लावण्यात मरखेल पोलिसांना यश आले आहे.

error: Content is protected !!