ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाण

*”शाळा चालू एस.टी. बंद. शाळेत जायचे कसे ?*   *विद्यार्थ्यांसह पालकामध्ये संभ्रम पाल्याला शाळेत पाठवायचे पण…. कसे ?* *”विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. खाजगी वाहनाने पालकांच्या खिशाला भुर्दड!* 

केज! प्रतिनिधि!

  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास दीड वर्ष बंद असलेल्या शाळा  दिवाळी नंतर सुरु झाल्या, माध्यमिक शाळांना अजून सुट्ट्या असल्यातरी महाविद्यालय आणि प्राथमिक शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहे मात्र गावापासून शाळेचे अंतर लांब असल्यामुळे अनेक मुलांनी बसचा पास काढून शाळेत ये-जा करतात पण २२, तारखेला शाळा सुरु झाल्या असतानाही विद्यार्थी शाळेत पोहचले नाही,  शाळेत जाण्यासाठी बस पर्याय आहे पण बस कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे बस धावत नाही तासनतास उभे राहून साधन मिळत नाही त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

    कोरोनामुळे शाळा बंद होत्या दिवाळी अगोदर काही दिवस शाळा सुरु झाल्या त्यात दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या,, सुट्ट्या संपल्या शाळा सुरु झाल्या आणि मुलांना शाळेची ओढ लागली शैक्षणिक नुकसान होऊ नये असं सर्वाना वाटतं  पण शाळेत जायला बस नसल्याने शाळेत कसे जावे असा प्रश्न विध्यार्थीना पडला आहे पालकांना देखील मुलांना शाळेत कस पाठवावे असा प्रश्न सतावत आहे राज्यकर्ते, प्रशासन आणि कामगार यांच्या लढाईत विध्यार्थी भरडला जात आहे,  जवळपास दीड वर्ष झालेले शैक्षणिक नुकसान कमी नाही त्यात अजून भर पडत  असल्यामुळे शाळा आणि शिक्षण याचा विसर लहान मुलांना पडलेला दिसतो.
विद्यार्थीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शासनाने कमी दर आकारणी करुन गरीब विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पास सुविधा सुरु केली आहे त्यासाठी महिन्याचे पैसे अगोदर देऊन पास घ्यावा लागतो या महिन्यात काढलेल्या पासचे पैसे वाया जात आहे आणि विध्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत आहे . 

विद्यार्थीना शाळेची उत्सुकता :-

कोरोनाचे संकट आल्यामुळे जवळपास दीड वर्ष शाळा बंद होत्या शाळा सुरु झाल्याने शाळेत जाण्याची विध्यार्थीची उत्सुकता शिगेला पोहचली असतांना बसचा संप झाला आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण झाली  पुन्हा एकदा शासन आणि कर्मचारी यांच्या वादात विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
एकीकडे मुले शिकली पाहिजे असं शासन म्हणत आणि दुसरीकडे शाळेसाठी येणाऱ्या अडचणीत लक्षणीय वाढ होत आहे ,आम्ही ग्रामीण भागातील मुलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आम्हाला  कॉलेजला जाण्यासाठी बस शिवाय पर्याय नाही पण शाळा सुरू होऊनही बस सुरु होत नसल्याने आम्हाला शाळेत जाण्याची सोय नसल्याने शाळेत जाणे बंद झाले आहे.
बस कर्मचारी आणि राज्यकर्ते, प्रशासन यांच्यात जवळपास बारा दिवस उलटून सुद्धा तोडगा निघत नाही हे लोकशाहीचे दुर्दैव . आहे आज गरिबांची लालपरी बंद असल्यामुळे  सामान्य नागरिक, विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत आहे, खाजगी वाहनधारक जास्तीचे पैसे घेतात, शासनाने कर्मचारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी, मंत्री यांनी एकत्रित येऊन तोडगा काढला पाहिजे दोन्ही वर्गाने सामान्य माणसाची इतकी कसोटी पहायला नको.

error: Content is protected !!