ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सुशीलकुमार शिंदेंच्या भाषणाने शरद पवारांच्या भाषणाची आठवण जे बदमाशी करतात त्यांची नक्कीच विल्हेवाट लावणार

सोलापूर संपादक – महेश पवार

सोलापूरात सोमवारी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन झाले. या बैठकीला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशच्या निरीक्षक सोनम पटेल, निरीक्षक चेतन चव्हाण, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्यासह इतर नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बैठकीला अल्प प्रतिसाद होता मात्र उपस्थित मरगळलेल्या कार्यकर्त्यांना शिंदे यांनी आपल्या भाषणातून ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला, सोलापूर शहरात चाललेल्या राजकीय घडामोडी नंतर प्रथमच असे वक्तव्य केले. काँग्रेस पक्षाला कायम अडचणी येत राहतात मात्र पुन्हा काँग्रेस उभारी घेते हा इतिहास आहे.
मी सुद्धा अडचणीच्या काळातच उत्तर सोलापूर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलो. सध्या सोलापुरात चित्र पाहतोय, गेलेले लोक पुन्हा काँग्रेस पक्षात परत येतील, हे मी लिहून देतो, सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, मी आता लक्ष घातले आहे,जी बदमाशी सुरू आहे ना त्यांची आता मीच विल्हेवाट लावणार असा सूचक इशारा दिला.
आमदार प्रणिती या रक्त आणि भक्त म्हणाली, काही गैर नाही त्यात मी तर थेट म्हणतो, एकाने जात स्वीकारली, दुसऱ्याने धर्म म्हणूनच आमचा पराभव झाला. हे सत्य आहे.
आम्ही लिनतेने वागणारे, ऐकूण घेणारे आहोत, परंतु मूळ स्वभावावर तर काही खरं नाही असा दम शिंदे यांनी फुटीरांना भरला.

error: Content is protected !!