ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

२४ तासांत देशात १६,७६४ नव्या बाधितांची भर

२४ तासांत देशात १६,७६४ नव्या बाधितांची भर

मुंबई (प्रतिनिधी) :-कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी आणि ओमायक्रॉनला वेळीच आवर घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध आज जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर देश पातळीवर देखील निर्बंध घातले जाण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशात देखील गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढी लागली आहे. शुक्रवारी सकाळी केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ७६४ नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातला ओमायक्रॉन बाधितांचा आकडा आता १२७० झाला आहे!

ओमायक्रॉनचा वाढता प्रसार, महाराष्ट्रात सर्वाधिक
देशभरात २३ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सध्या असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. सध्या असलेल्या अॅक्टिव्ह ओमायक्रॉन बाधितांचा आकडा १२७० असून त्यात सर्वाधिक ४५० ओमायक्रॉन बाधित हे महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल ३२० दिल्लीत, १०९ केरळमध्ये तर ९७ बाधित गुजरातमध्ये आहेत.

देशभरात २२० मृत्यू
केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत २२० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. व्यापक लसीकरणामुळे करोनाची बाधा झाल्यानंतर त्याचं स्वरूप गंभीर आजारात रुपांतरीत होण्याचं प्रमाण घटल्याचं

error: Content is protected !!