ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

थंडीच्या मोसमात पेट्रोलचे दर वाढतातच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा दावा.

थंडीच्या मोसमात पेट्रोलचे दर वाढतातच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा दावा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक शहरांमध्ये तर एक लिटर पेट्रोलचा दर शंभर रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे. त्यामुळे अनेकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. अनेक पक्षांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात देशात आंदोलन केल्याचं बघायला मिळालं आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अनोखं उत्तर दिलंय. थंडीच्या मोसमात पेट्रोल-डिझेलचे दर वाढतातच, असा दावा त्यांनी केला आहे. त्याचबोरबर हिवाळा संपल्यावर पेट्रोल-डिझेलचा दर कमी होईल, असं त्यांनी सांगितले आहे.

“आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने त्याची झळ सर्वसामान्य ग्राहकांनादेखील बसत आहे. हिवाळा संपला की, दर थोडेफार कमी होईल. हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. पेट्रोल-डिझेलची मागणी वाढल्याने किंमती वाढल्या. थंडीच्या मोसमात हे असं नेहमी होतं. पुढच्या काही दिवसांमध्ये किंमती कमी होतील”, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

देशातील महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलचे दर हे ९०.९३ रुपये प्रति लिटर होते. तर डिझेलचे दर प्रति लिटर ८१.३१ रुपये इतके होते. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९७.३४ तर डिझेलचे दर प्रति लिटर 88.44 रुपये आहेत. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ९४.६८ तर डिझेलचे दर प्रति लिटर ८४.२० रुपये इतकं होतं. तर बंगळुरुमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ९३.९८ तर डिझेलचे दर प्रति लिटर ८६.२१ रुपये इतकं होतं.

दररोज ०६ वाजता बदलतात किमती.

दररोज सकाळी ०६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी ०६ वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

error: Content is protected !!