ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी व काँग्रेसचा लढा.

 

मुंबई, दि. २८ मार्च
भारतीय जनता पक्षाकडे देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मागील ९ वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आहे परंतु या सरकारने जनतेच्या हिताचे एकही काम केलेले नाही. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, जगणे कठीण झाले आहे, बेरोजगारीने तरुणवर्ग त्रस्त आहे, नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीसाठी लागणारे साहित्य, खत, बि-बियाणे महाग झाले आहे. कोणत्याच घटकाचा विकास मोदी सरकार करु शकले नाही. या मुळ प्रश्नांवर भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून जाणीवपूर्वक सावरकरांचा मुद्दा पुढे करुन मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे.

राहुल गांधी हे सातत्याने नरेंद्र मोदी यांना जनतेच्या प्रश्नांवर जाब विचारत असतात. राहुल गांधी हे देशातील एकमेव नेते आहेत, जे मोदी सरकारच्या कारवायांना न डगमगता ताठ मानेने तोंड देत आहेत. भाजपाने राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी सर्व प्रयत्न करुन पाहिले पण त्यात त्यांना यश आले नाही. आताही खासदारकी रद्द केली, सरकारी घर खाली करण्यास सांगितले, त्याआधी ईडी चौकशी मागे लावली पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. देशात आज लोकशाही व्यवस्था, संविधान धोक्यात आलेले आहे, सर्व यंत्रणा सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या आहेत, याविरोधात लढा देण्याची गरज असून राहुल गांधी व काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान वाचवण्यासठी लढत आहेत आणि ही लढाई आम्ही लढत राहु, असेही नाना पटोले म्हणाले.

error: Content is protected !!