ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

श्री मशरूम गणपती येथे गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व सीबीआयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती व प्रसाद वाटप…

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी लोकहिता साठी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील सातवा श्री मशरूम गणपती येथे गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त पंचामृत महाअभिषेक, सुवर्णालंकार पूजा,ध्वजारोहण श्री गणपती पाळण्यात स्थानापन्न,महाआरती, गुलाल पाळणा, महानैवैद्य आधी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे व संजय पतंगे यांनी केले यावेळी विघ्नहर्ता श्री गणरायाला सोलापूरला नव्या वैभवावर न्यावे तसेच भक्तावर कोणतेही संकट येऊ नये असे साकडे घातल्याची प्रतिक्रिया खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले… यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी सर्व सोलापूरकरांवर कुठलेही संकट येऊ नये म्हणून श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी अष्टविनायकाची स्थापना केली त्यातला हा सातवा गणपती आहे श्री मशरूम गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून परिचित आहे त्यामुळे भक्तांची अफाट गर्दी दिसून आली तरी मी मशरूम गणपती चरणी अशी प्रार्थना करतो की सर्व गणेश भक्तांना सुख समृद्ध आरोग्य समाधानी ठेवावे असे मनोगत व्यक्त केले…. भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांनी सात ते आठ हजार भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे सांगितले व प्रमुख पाहुण्यांचा श्री ची प्रतिमा शाल देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मंदिराची पुजारी धनंजय पतंगे, संजय पतंगे, बाळासाहेब वाघमारे, भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी, रुद्रमणी हिरेमठ, राजशेखर हत्ती, तुषार आवजे, भैय्या पतंगे,ईश्वर पतंगे, अमोल तांबे, विशाल सुरवसे, निलेश स्वामी, बाबुराव शितोळे,दीपक देशमुख, गणेश होैशेट्टी,नागराज हौशेट्टी आधी भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते……

error: Content is protected !!