ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

वैद्यनाथ साखर कारखान्याने केले दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

वैद्यनाथ साखर कारखान्याने केले
दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

परळी (प्रतिनिधी) पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि अनेक अडचणींवर मात करीत कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ कारखाना चालू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हीत लक्षात घेऊन वैद्यनाथ कारखाना सुरू करण्यात आला असुन यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण दुर झाली आहे. आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता. मात्र माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी यावर्षी कारखाना सुरू करून यशस्वीरित्या चालू केला आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 या गळीत हंगामात दिनांक 25 फेब्रुवारीपर्यंत 2 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असुन 1 लाख 75 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे तर सरासरी साखर उतारा 10. 44 टक्के असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान कारखान्याने गाळपाची यशस्वी परंपरा कायम राखल्याबद्दल कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे सर्व संचालक मंडळ यांनी ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, कर्मचारी, अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!