ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

केजतालुक्यातील जिवाची वाडी भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ

केजतालुक्यातील जिवाची वाडी भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केल्याप्रकरणात गटविकास आधिका-यांवर कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांना तक्रार:-
:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

बीड  : (प्रतिनिधि)

केज तालुक्यातील मौजे जिवाची वाडी येथील गटविकास भ्रष्टाचार प्रकरणात जाणीवपुर्वक टाळाटाळ करणारे गटविकास आधिकारी श्री. दराडे पंचायत समिती केज यांच्यावर दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल तसेच ग्रामपंचायत बरखास्तीची शिफारस न करणे आणि तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कारवाई करण्यास सक्षम नसलेल्या आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना लेखक तक्रार केली आहे 

सविस्तर माहीतीस्तव:- 

_____________________________

जिवाची वाडी दोषारोपपत्र सिद्ध होऊनही कारवाई नाही:-

______________________________ केज तालुक्यातील मौजे जिवाची वाडी येथील सन 2018-19 या कालावधीत 14 व्या वित्त आयोगातुन केलेल्या कामासंदर्भात भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यासाठी दि. 23/07/2019 रोजी विस्तार आधिकारी श्री.कांबळे व्ही. एम.व श्री.चव्हाण एस. एम.(शा.अ.)यांची मा. कार्यकारी दंडाधिकारी, केज यांचे पत्र क्रं.2019/एमएजी/कावी/384/2019  दि.01/08/2019 नुसार चौकशी करून तात्काळ अहवाल देण्यास सांगितले.त्या आदेशानुसार विस्तार आधिकारी यांनी दि. 01/09/2020 रोजी श्री.दराडे गटविकास आधिकारी पं.स.केज यांना  अहवाल सादर केला.

ग्रामसेवक धपाटे व सरपंच कुटे भ्रष्टाचार प्रकरणात दोषी सिद्ध:- विस्तार आधिकारी कांबळे व्हि. एम. 

______________________________ विस्तार आधिकारी कांबळे यांनी दराडे गटविकास आधिकारी पं.स.केज यांना पाठवलेल्या अहवालात धपाटे ग्रामसेवक यांनी 14 व्या वित्त आयोगाच्या जळ खरेदी वस्तु नमुना नं.16 वर नोंद नसल्याचे तपासणीत आढळून आल्यामुळे दोषी असल्याचे म्हटले आहे.ग्रां.पं.ची चटई खरेदी करताना चेक नं.38821 अदाई केली आहे .परंतु रक्कम 50 हजार रूपयांची खरेदी आहे.दरपत्रक न मागवता अनियमितता केली आहे. दलित वस्ति सिमेंट क्राॅक्रीट रस्ता 7 लक्ष रूपये मंजूर असून कामाचे ई-टेंडरींग केलेले आहे, काम सुरू न करताच गुत्तेदाराला 2 लाख रूपये अग्रिम देण्यात आलेले आहे. ग्रामसेवकाने अनियमितता केली आहे.दलित वस्तीचे काम आर्थिक व भौतिक दृष्ट्या पूर्ण झाल्याचे दिसून आले मात्र तांत्रिक दृष्ट्या पुर्ण नसल्याचे दिसुन आले. धपाटे ग्रामसेवकाने 14 व्या वित्त आयोगातुन 13/06/2018 रोजी बायनेम चेक कॅश करून 50 हजार रूपये उचल करून नक्कीन मशिन खरेदी केली आहे,सदरील मशिनचे कोटेशन व दरपत्रक न मागवल्यामुळे अनियमितता दिसून आली असून यास ग्रामसेवक व सरपंच जबाबदार आहे. 

दि.14/02/2019 रोजी किर्द क्रं.18 वर चेक क्रं. 18236 प्रमाणे  90 हजार रूपये उचलुन 14 व्या वित्त आयोगातुन शाळा दुरूस्तीचे काम दाखवले आहे. परंतु किर्दीप्रमाणे दाखविलेले काम तांत्रिक मान्यता न घेता किर्दीवर सादर खर्च   दाखवून ग्रामसेवक यांनी 90 हजार दाखवून   अपहार दिसुन येतो. वरील सर्वास ग्रामसेवक व सरपंच दोषी आहेत.  वरील प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यातयावी अशी लेखी  मागणी करूनही अद्याप कारवाई करण्यात आली नाही .

 

तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली, विभागीय आयुक्तांना तक्रार:- डाॅ.गणेश ढवळे 

______________________________, 7  जानेवारी रोजी  गोरख चौरे  ,बहुजन क्रांती संघटना ,मराठवाडा विभागप्रमुख यांच्या तक्रारीवरून तहसिलदार यांनी गटविकास आधिकारी पं.स.केज यांना संबधित प्रकरणात चौकशी करून अहवाल कार्यालयास व तक्रारदारास कळवण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, सदर प्रकरणात ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी असुन गटविकास आधिकारी श्री. दराडे यांनी दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई यावी अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांना केली आहे

error: Content is protected !!