ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

लातूर येथील पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना न्याय आणि त्वरित संरक्षण देण्याची मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी.

लातूर येथील पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना न्याय आणि त्वरित संरक्षण देण्याची मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️लातुर | प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन घटना निदर्शनास आणुन दिली.
माँसाहेब जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्रीबाई यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात १२ मार्च २०२१ रोजी दिवसाढवळ्या कोपरा (किनगांव) ता. अहमदपूर जि. लातूर येथील एका भगिनीवर अनन्वित अत्याचार केले गेले होते.

यानंतर त्या नराधमांनी त्यांचे लागेबांधे वापरून त्या गरीब, असाह्य निर्भयावर व तिच्या कुटुंबातील सदस्यांवर खोट्या ॲट्रॉसिटीसह इतर केसेस दाखल केल्या. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चा कडुन निवेदन देऊन पुढीलप्रमाणे मागणी करण्यात आली आहे;

१. निर्भया व तिच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात टाकलेल्या खोट्या केसेस तत्काळ रद्द कराव्यात.

२. निर्भयावर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करून कडक शासन करावे.

३. निर्भयाला अमानुषपणे वागणूक देणाऱ्या खाकीतल्या भक्षकांना तत्काळ निलंबित करणे.

४. निर्भया व तिच्या कुटुंबीयांना त्वरित पोलीस संरक्षण देणे.

५. शासनाने निर्भयाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे.

आपल्या मार्फत शासन प्रशासनास निदर्शनास आणून देऊ इच्छितो. आपण संवेदनशीलपणे यावर ७ दिवसाच्या आत कारवाई कराल अशी अपेक्षा आहे; अन्यथा लोकशाहीत असणाऱ्या संवैधानिक अस्त्रांचा वापर करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

हे निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
२. महिला व बालकल्याण मंत्री
३. गृहमंत्री
४. पालकमंत्री, लातूर
५. राष्ट्रीय महिला आयोग
६. राज्य महिला आयोग यांना देखील पाठवण्यात आले आहे.

error: Content is protected !!