ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

संभाजीराजे छत्रपती उद्या करणार मोठी घोषणा ; नवीन पक्ष काढणार !

संभाजीराजे छत्रपती उद्या करणार मोठी घोषणा ; नवीन पक्ष काढणार !

🔸अशोक काळकुटे | संपादक

सहा वर्षांपूर्वी भाजपने संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. तेव्हापासून ते या पक्षाचे सह्योगी सदस्य होते. मात्र पक्षाच्या व्यासपीठापासून ते कायम दूर राहिले. आता खासदारकीची मुदत संपल्यानंतर ते नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.
दरम्यान उद्या दि.१२ मे रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या दाव्यानुसार संभाजीराजे छत्रपती हे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याची शक्यता आहे.
सर्वच पक्ष संभाजीराजे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी आतुर आहेत. सर्वांनीच संभाजीराजे यांनी आपल्या पक्षात यावे त्यांचे स्वागत आहे असे स्पष्ट केलेले आहे.
परंतु संभाजीराजे नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान सूर्योदय ला मिळालेल्या माहितीनुसार संभाजीराजे छत्रपती हे स्वतंत्र एक नवीन राजकीय पक्ष काढणार आहेत. आणि त्याचाच मोठा निर्णय उद्या पुण्यातुन जाहीर करणार आहेत.
यापुर्वीच याची जवळपास संपूर्ण तयारी दिल्लीतच झाल्याचाही अंदाज आहे. कारण संभाजीराजे आणि त्यांचे सर्वच निकटवर्तीय हे मार्च-एप्रिल मध्ये बरेच दिवस दिल्लीत होते. यावरुनच नवीन राजकीय पक्षाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

error: Content is protected !!