ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मंद्रूप अप्पर तहसीलच्या मंडलाधिकाऱ्यासह कोतवालाला 25 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी अटक..

सोलापूर संपादक – महेश पवार

वारस नोंदीच्या हरकतीवर सुनावणी होऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच मागितल्याने मंडल अधिकार्‍यासह कोतवालास दोन वेळा पडताळणी करून अँटीकरप्शन विभागाने ताब्यात घेतले आहे.
1) मदनसिंग सुपडसिंग परदेशी वय 35 वर्षे, पद- मंडल अधिकारी, अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता. दक्षीण सोलापूर, 2) मल्लिनाथ रेवणसिध्द बाळगी वय 36 वर्षे, पद- कोतवाल, अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता. दक्षीण सोलापूर.या दोघांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी कार्यालय येथे दिलेल्या वारस नोंदीच्या हरकती अर्जावर सुनावणी होवून तक्रारदार यांचे बाजुने निकाल देणेसाठी यातील आरोपी कोतवाल मल्लिनाथ बाळगी यांनी मंडळ अधिकारी परदेशी यांचे करिता म्हणुन तक्रारदार यांचेकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली व त्याबाबत खात्री करुन देणे करिता तक्रारदार यांचे मंडळ अधिकारी परदेशी यांच्याशी फोनवरुन बोलणे करुन दिले असता मंडळ अधिकारी परदेशी यांनी त्यास संमती दिल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोलीस नाईक अतुल घाडगे, पोलीस शिपाई स्वप्नील सण्णके,पोलीस शिपाई उडानशिव सह अँन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

error: Content is protected !!