ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप -काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप -काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

पुणे(प्रतिनिधी) :- तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.

राम मंदिर उद्गाटनाचा मुद्दा भाजपकडून लोकसभेच्या तयारीसाठी वापरला जात असल्याबद्दल विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा हा राम भक्तांचा, कारसेवकांची, रामावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. श्रद्धा असलेला प्रत्येक जण या सोहळ्यासाठी जात आहे. याबद्दल कोणालाच दु:ख होण्याचे कोणतेच कारण नाही.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शनासाठी जात आहे. याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे कुठल्याही मंदिरात चालले हेही नसे थोडके.

error: Content is protected !!