ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मेस्टाच्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद विरोधीपक्ष नेते आंबादासजी दानवे यांच्या हस्ते होणार

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक.दै. महाराष्ट्र सूर्योदय

मेस्टाच्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद विरोधीपक्ष नेते आंबादासजी दानवे यांच्या हस्ते होणार

पुणे (प्रतिनिधी):- इंग्रजी शाळा या विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीनुसार शुल्क आकारून गुणवत्तेचे शिक्षण देतात. त्यामुळे राज्यात बहुसंख्य पालकांचा विश्वास हा इंग्रजी शाळांवर आहे. मात्र सरकार आम्हाला आरटीई शुल्काची प्रतिपूर्ती वेळेत करत नसल्याने संस्था चालकांना शाळा चालवणे कठीण झाले आहेत. त्यामुळे पालक आणि संस्थांमध्ये अनेकदा वाद होतात,

त्यासाठी सरकारचे धोरण जबाबदार असल्याने यातून योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यातील इंग्रजी शाळांच्या सुरक्षेसाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी आज महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज आसोसिएशनचे (मेस्टा) अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

मुंबईत भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात संघटनेचे ९ वे राज्यस्तरीय अधिवेशन १८ आणि १९ जानेवारी रोजी होत असून या अधिवेशनात आम्ही इंग्रजी शाळांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्यासाठी ठराव करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मेस्टाच्या या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, मुंबईचे पालकमंत्री व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व विधानपरिषद विरोधीपक्ष नेते आंबादासजी दानवे यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील दोन हजार संस्थाचालक या दोन दिवसीय अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत.

या अधिवेशनास सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना नेते सचिन आहीर, आमदार वर्षा गायकवाड, प्रहारचे जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ गावंडे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे अभिनेत्री निशीगंधा वाड आदींसह मेस्टाचे राज्य कार्यकारीणी, विभागीय कार्यकारीणी व राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारीणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती तायडे पाटील यांनी दिली.

या अधिवेशनात पहिल्यांदाच देण्यात येणारा शिक्षण महर्षी पुरस्कार विबग्योर हाय गृप ॲाफ स्कुलचे संस्थाचालक रूस्तोम केरावाला तर जीवन गौवरव पुरस्कार पोदार ग्रुप ॲाफ स्कुलचे संस्थाचालक पवन पोदार , प्रसिद्ध लेखिका विजया वाड व लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे यांना जाहीर झाले आहेत. शिक्षण मित्र म्हणुन अजय दरेकर , योगीता तोडकर, श्रीनिवास ध्यावर शेट्टी डॉ. अशोक गुप्ता यांना दिले जाणार आहेत.

याच बरोबर राज्यभरातुन येणाऱ्या इंग्रजी शाळा संस्थाचालकांतुन ११ बेस्ट ट्रस्टी आवार्ड, २२ बेस्ट स्कुल आवार्ड, १८ बेस्ट प्रिंसिपल आवार्ड, ४४ बेस्ट टिचर आवार्ड, सांस्कृतिक महोत्सावातील विजेते व वर्ष २०२३-२४ मेस्टा- स्टुडेंट केअर टॅलेंट सर्च परिक्षा दिलेल्या दोन लाख विद्यार्थ्यांमधुन राज्य पातळींवर प्रथम, द्वितीय, तृतीय गुण प्राप्त विद्यार्थ्याना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!