ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता आयुष्मान भारत योजनेचा मिळणार लाभ

धनंजय कुलकर्णी -उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता आयुष्मान भारत योजनेचा मिळणार लाभ

दिल्ली :- आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. देशभरातील सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या. यामध्ये महिला, तरुण आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आला.

गेल्या 10 वर्षांत महिला सक्षमीकरणावर भर, महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल, तिहेरी तलाक हा मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात 70 टक्के महिलांना घरं मिळाली, असे अर्थमंत्री सीतारामण यांनी सांगितलं.

बजेटमध्ये महिलांसाठी काय?
तिहेरी तलाक प्रथा बंद केली

महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार

पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरं महिलांना

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण वाढविले जाईल, सर्व क्षेत्रांमध्ये नॅनो DAP चा वापर वाढविला जाईल

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर, काय तरतूदी सांगितल्या?
सरकार नेक्स्ट जेनरेशन रिफॉर्म आणणार
पुढच्या 5 वर्षांत गरीबांसाठी 2 कोटी घरं बांधणार
MSME साठी व्यावसाय सोपा करण्यासाठी काम सुरू
गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक क्षेत्र सज्ज
रूफटॉप सोलर प्लान अंतर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिट/महिना फ्री वीज
देशात जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार
डेअरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच योजना आणणार
सर्वाइकल कॅन्सरसाठी लसीकरण वाढविलं जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढविला जाईल
देशात 15 नवी एम्स रुग्णालये तयार करणार
पाच एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन करणार
सौर ऊर्जा योजनेद्वारे 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देणार
पुढील दोन वर्षांत दोन कोटी घरे बांधणार
शेतीसाठी आधुनिक साठवण
पुरवठा साखळीवर भर
सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला आणखी प्रोत्साहन
मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केलं जाईल
सागरी अन्न निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष्य
सरकार 5 एकात्मिक एक्वा पार्क उघडणा
PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत
पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ दिला.
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार आहे
शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर,
सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार
मत्स्यपालन योजनेला चालना देणार
सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य
सरकार 5 इंटीग्रेटेड एक्वा पार्क्स उघडणार

error: Content is protected !!