ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

शिवजयंती निमित्त मार्डीत 19 तारखेला मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन उपक्रमातून शिवजयंती, यश फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सोलापूर संपादक- महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

ह्रदयाचे ठोके वाढविणारा डॅाल्बीचा आवाज नाही…गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने पर्यावरणाचे प्रदूषण नाही, उत्सवातील या अतिरेकाला फाटा देत मार्डी येथील उद्योगपती प्रल्हाद काशीद यांनी यश फाऊंडेशनच्या माध्यमातून उपक्रमातून शिवजयंती साजरी करण्याचे व्रत हाती घेतले असून शिवजयंती निमित्त यंदा सोमवारी (दि.19) महिला व पुरुषांसाठी मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शिवजयंती निमित्त मॅरेथॅान स्पर्धा आयोजित करण्याचे हे दुसरे वर्ष आहे तर यादिवशी रक्तदान शिबीर, वृक्षारोपण उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून यश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद म्हणाले, रक्तदान शिबिराचे हे पाचवे वर्ष असून मागील चार वर्षात साडेआठशे रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. तर एक हजार झाडे लावून ती जगविण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केवळ महाराष्ट्रापुरताच नाही तर संपूर्ण भारत देशात आणि परदेशातही होत आहे. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये महाराजांची मोठी प्रतिमा बसविण्यात आली असून द् मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांना अमेरिकेने गौरविले आहे. उत्तर प्रदेशात देखील यंदा महाराजांची जयंती राष्ट्रीय उत्सव म्हणून राजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्श मूल्यांची जपणूक केली तर शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडायला वेळ लागणार नाही. जयंती साजरी करीत असताना गुलालाची आनंदोत्सव जरुर साजरा करावा, मात्र हा दिवस एक चिंतन दिन व प्रेरणादिन म्हणून साजरा करण्याची गरज आहे. म्हणूनच उपक्रमातून शिवजयंती हे ब्रीद घेऊन यश फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी व तरुणांना योग्य दिशा देणारे उपक्रम राबविण्याला आम्ही सुरुवात केली आहे.
या उपक्रमातील एक भाग म्हणून गेल्यावर्षीपासून महिला व पुरुषांसाठी मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती दिनी सकाळी सात वाजता मार्डी येथील मार्डी – होनसळ रस्त्यावर असलेल्या स्कायलॅान वॅाटर प्लॅन्ट व यश फाऊंडेशनच्या संपर्क कार्यालय येथे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुरुषांसाठी दहा किमी तर महिलांसाठी पाच किमीची मॅरेथॅान स्पर्धा ठेवली आहे. स्पर्धेत सर्वांसाठी प्रवेश खुला असून पुरुषांसाठी प्रथम बक्षीस 15 हजार 100 रुपये, दुसरे बक्षीस 10 हजार 100 रुपये, तिसरे बक्षीस 7 हजार 100 रुपये, चौथे बक्षीस 5 हजार 100 रुपये तर उत्तेजनार्थ 3 हजार 100 रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. महिलांसाठी पहिले बक्षीस, 10 बजार 100 रुपये, दुसरे 7 हजार 100 रुपये, तिसरे 5 हजार 100 रुपये, चौथे 3 हजार 100 रुपये व उत्तेजनार्थ 1 हजार 100 रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील पुरुषांनी शंभू गायकवाड, अविनाश गोंगाणे, प्रतिक पवार, गणेश बचुटे, योगेश माळी तर महिलांनी सुवर्णा झाडे, वृषाली पवार यांच्याकडे नावे नोंदवावीत असे आवाहन प्रल्हाद काशीद यांनी केले आहे. तसेच जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!