ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

बीड (प्रतिनिधी):-बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार  गटाचे आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदार संघातील स्थानिक पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री कन्हेवडगाव येथे घडली असून गाडी पेटवतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कमेऱ्यात कैद झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या आष्टी तालुक्यातील कन्हेवडगाव येथे राम खाडे यांनी राहत्या घरासमोर, स्कॉर्पिओ गाडी (क्र. एमएच 23, एएस 3044) उभी केली होती. मध्यरात्री 1 वाजता 4 अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून घराजवळ आले. त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. त्यानंतर काचावर दगड मारले.

आवाज होताच टवाळखोर पळून गेले. दुसरीकडे खाडे यांचे बंधू बाहेर आले. त्यांनी कुटुंबियांना उठवले आणि गाडीवर पाणी टाकून आग नियंत्रणात आणली. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान राम खाडे यांनी भाजप आमदार सुरेश धस त्यांची पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर संशय व्यक्त केला असून तशी नोंद देखील पोलीस ठाण्यातील एफआयआरमध्ये आहे. याप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!