ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मंद्रूप जिल्हा परिषद गटात मातब्बर इच्छुक उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठीची होणार दमछाक!

मंद्रूप जिल्हा परिषद गटात मातब्बर इच्छुक

उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठीची होणार दमछाक!

सोलापूर संपादक – महेश पवार

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात हेवीवेट मतदारसंघ म्हणून ओळखला जाणा-या मंद्रूप जिल्हा परिषद गट यंदा सर्वसाधारण होणार असल्याची शक्यता असल्याने या गटात इच्छुकांची आतापासूनच भाऊगर्दी उडाली आहे,  यामुळे येथील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.
सध्या मंद्रूप जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून येथे राष्ट्रवादीच्या विद्युल्लता कोरे हे प्रतिनिधित्व करीत आहेत यंदा २०२२ च्या जिल्हा परिषद निवडणूक साठी अनेक जण इच्छुक असल्याने त्यातच मंद्रूप गट सर्वसाधारण होणार असल्यामुळे उमेदवाराची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे सध्या भाजप कडून सोलापूर बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील वडकबाळकर, दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे,माजी सरपंच पिराप्पा म्हेत्रे, मंद्रूप भाजपचे पॅनल प्रमुख मळसिध्द मुगळे,भाजपचे तालुका संघटक गौरीशंकर मेंडगुदले,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष
प्रशांत कडते यांची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे पक्षश्रेष्ठींना येथील उमेदवार ठरवताना नाकीनऊ येणार आहे. येथे आप्पासाहेब पाटील,  गुरुसिद्ध म्हेत्रे,मळसिध्द मुगळे,
गौरीशंकर मेंडगुदले,प्रशांत कडते हे सर्वजणच दावेदार असल्यामुळे येथे कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न भाजपच्या पक्षश्रेष्ठींना पडणार आहे,म्हेत्रे यांनी काँग्रेस

पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे त्यांना उमेदवारी मिळणार का?पाटील,मुगळे,मेंडगुदले हे म्हेत्रे याचा प्रचार करणार का?जर मेंडगुदले यांना उमेदवारी मिळाल्यास या तिघांची भूमिका काय असणार?असे उलटसुलट चर्चा सध्या रंगत आहेत.

जर मुगळे यांना भाजपने डावल्यास ते ऐनवेळी काँग्रेस अथवा शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून आप्पाराव कोरे यांचे एकमेव नांव समोर येत आहे. काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष तथा मंद्रूपचे अनंत म्हेत्रे, अकोलेचे युवा नेते रमेश आसबे,मंद्रूपचे उपसरपंच अल्लाउद्दीन शेख,कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील आदीजण इच्छुक आहेत,निवडणुकीस अद्यापही तीन-चार महिने अवकाश असला तरी इच्छुक आतापासूनच कामाला लागले आहेत.तालुक्यात एक जिल्हा परिषद गट वाढण्याची शक्यता असल्याने सर्वसाधारण जागा वाढणार आहेत.

error: Content is protected !!