ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

उत्तर सोलापूर शिवसेनेची बैठक संपन्न….

सोलापूर संपादक- महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभूते

शिवसेना शिवसंवाद यात्रेनिमित्त उत्तर सोलापूर शिवसेना पक्षाची शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश (दादा) वानकर यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे, शिवसेना तालुका समनव्यक वजीर शेख,तालुका प्रमुख शहाजी भोसले, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पौळ,माजी सभापती पांडुरंग पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह, सोलापुर येथे आढावा बैठक पार पडली….

सदरच्या बैठकीत प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख शहाजी भोसले यांच्या मुलाचे निधन झाल्यामुळे, सर्व शिवसैनिकांवर शोककळा पसरली असल्याची भावना शिवसेना विभाग प्रमुख यांनी व्यक्त करत सर्वांनी दोन मिनिट श्रद्धांजली वाहून बैठकीची सुरुवात केली…
शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या शिवसंवाद यात्रेसंबंधी माहिती शिवसैनिक व युवासैनिकांना देण्यात आली.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक, युवासेनेचे तालुका अध्यक्षपदी अजिंक्यराणा देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सत्कारही करण्यात आला….
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर म्हणाले की,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाचे पालन करून उत्तर तालुक्यात शिवसंपर्क अभियान भाग 2 मोठ्या उत्साहाने राबविण्यासाठी तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींच्या कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले. आता राज्यात आपले सरकार आहे. आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ग्रामपंचायतच्या निधीसाठी मंत्रालयीन पातळीवर निधी खेचुन आणण्यासाठी आपणांस जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यासाठी मी जिल्हाप्रमुख या नात्याने लागेल ते सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.तसेच 23 जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी,तसेच उत्तर सोलापूर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कामाला लागण्याचे आदेशही दिले. शिवसेना तालुका प्रमुख यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत, तालुक्यातील सर्वांच्या समस्या आपण सर्वजण मिळून सोडवूया,तसेच आपल्या समस्या पक्षाच्या वरील नेत्यापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रामाणिक पणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही  दिली. नान्नज गावचे शाखा प्रमुख प्रमोद गवळी, विभाग प्रमुख हुकूम राठोड यांनी आपले विचार मांडले…
यावेळी विभाग प्रमुख सदाशिव सरगर,विभाग प्रमुख सचिन घोडके,विभाग प्रमुख हुकुम राठोड,युवासेनेचे तालुका समनव्यक प्रसाद नीळ,ज्येष्ठ नेते राजाराम कोलते,शाखा प्रमुख प्रमोद गवळी,कोंडी गावचे सरपंच सुरेश राठोड,गुळवंची गावचे सरपंच विष्णु भोसले,पाकणी शाखा प्रमुख मुकुंद यादव,शाखाप्रमुख विजय नितळ,माजी सरपंच नारायण जगताप,विकास मुगळे,समाधान जाधव, बाळकृष्ण पाटील, तुकाराम भोसले, लक्ष्मण साबळे, ज्ञानेश्वर वाघमोरे, अर्जुन साबळे, लक्ष्मण मुळे,राहुल रोकडे,रामा साबळे, विकास पवार,प्रताप गरड,समाधान सावंत,विकास मुगळे,हरिदास कुंभार,गोविंद भोसले,ज्ञानेश्वर भोरे,महेंद्र डोंबाळे,बनश्याम यलगुंडे, अभिषेक पवार,ज्ञानेश्वर मोरे, गोविंद पाटील,राजु घाटे, अर्जुन रोमन, कोंडी गावचे उपसरपंच किसन आबा भोसले,शशिकांत माळी,अरूण साठे,राजेंद्र भोसले,रमेश शिंदे, बाळासाहेब वाघमोरे,श्रीकांत ननवरे, विनोद भिंगारे,प्रकाश काळे,अविनाश चाफाकरांडे, प्रताप साठे,तुकाराम साठे,सुनील कांबळे,रमेश शिंदे,मनोज निंबाळकर,शिवाजी कोले,शिवाजी भोसले यांसह उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व शिवसेना,युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या बैठकीचे प्रास्तविक व आभार प्रदर्शन शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पौळ यांनी केले…

error: Content is protected !!