ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागर

हरू येथील आश्रम शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेश एकंडवार :- ‌ दारव्हा: दारव्हा तालुक्यातील वसंत विमुक्त जाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियानाअंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु.राखी गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून कु. प्राची शिंदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कु. अक्षरा गाढवे कु.प्रणाली शिंदे या मंचावर विराजमान होत्या सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या सर्व सावित्रीच्या लेकींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन विनम्र अभिवादन केले तसेच समस्त शिक्षक बंधू-भगिनींनी पुष्प वाहून प्रतिमेस वंदन केले नंतर कु. साक्षी रमखाम व कु.कुमकुम गायकवाड यांनी स्वागत गीताने सर्वांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई च्या वेशभूषेत कु.अक्षरा गाढवे व कु.राखी गायकवाड, कु.प्रणाली शिंदे यांनी सावित्रीचे दर्शन घडविले कार्यक्रमात अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच “होय मी सावित्री बोलतेय “हा एकपात्री प्रयोग कु.प्राची शिंदे हिने सादर केला. कार्यक्रमाचे मार्गदर्शक शिक्षक विजय काळे सर, रामदास सरताबे सर होते यावेळी प्राचार्य राजेंद्र मांगे सर ,प्रकाश गोंडाणे सर शाळेचे व्यवस्थापक बंडूभाऊ सरतापे पाटील ,निलेश गलाट सर, दुष्यंत राठोड सर, रामदास देवळे सर, अनिल जाधव सर, ज्ञानेश्वर मस्के,यांनी कार्यक्रमा प्रसंगी शुभेच्छापर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.उषा बावणे तर आभार कु.वेदिका श्रीनाथ यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दिनेश चूटे, पुरुषोत्तम भुते, चिंतामण सरतापे जितेंद्र गाडगे तसेच कु .वैष्णवी वै मस्के ,कु .हर्षा गावंडे कु. निता चौधरी , कु.वैभवी मस्के,संतोष जोगदंड, सौरभ गावंडे कु. गायकवाड ,कु.कोमल रिठे,कु.साक्षी रमखाम, आदेश बावणे,कु .कुमकुम गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले

error: Content is protected !!