ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अक्षय खताळ यांचा शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. . . .

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

राजकारणात चांगल्या आणि वाईटाची किंमत जर सारखीच होत असेल तर हे चुकीचे आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे – बळीराम काका साठे

अक्षय तानाजी खताळ यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजनजी (मालक) पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दिलीप (भाऊ)कोल्हे, मोहोळ पंचायत समिती सदस्य अजिक्यराणा पाटील, सोलापूर बाजार समितीचे संचालक जितेंद्र बाबा साठे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशिद, सज्जनराव पाटील, जयदीप साठे या वेळी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रल्हाद काशिद यांनी केले
यावेळी अक्षय खताळ यांनी बोलताना सांगितले की, माझी पहिल्यापासूनच राष्ट्रवादीत काम करण्याची इच्छा होती तसे मी आमच्या पप्पाना बोलून दाखवली होती. आता आम्ही जोमाने काम करू. यावेळी दिलीप कोल्हे बोलताना पवार साहेब, अजितदादानीं सांगितले की या आमदारला निवडून आणा तर १५ दिवसात आमदार करण्याची ताकत राजन मालकामध्ये आहे. अक्षय तुम्ही त्यांच्या सोबतच रहा. राजन पाटील आपल्या भाषणात तानाजी जरी आमच्या पक्षात नसला तरी माझे आणि तानाजीचे चांगले संबंध होते. बाळराजे, अजिक्यराणा सारखेच तुला ही समजतो. पवार साहेबाशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. साखर कारखाने जे जिवंत आहेत ते पवार साहेबांमुळेच जिवंत आहेत. दोन महिने झाले एस टी कर्मचा-याचा संप मिटत नव्हता शेवटी पवार साहेबांनी हस्तक्षेप करुन तो संप मिटविला. अध्यक्षीय भाषणात काका साठेनी सांगितले लांबोटीचे प्रसिद्ध कुटूंब म्हणून खताळ यांना ओळखतात त्यांच्यातले तरुण नेतृत्व अक्षय खताळ, भविष्यात काम करणेसाठी जी जबाबदारी त्यांच्यावर टाकल ते चांगल्या प्रकारे पार पाडतील.
राजकारण हे काही स्थिर नसत कधी काही घडेल सांगता येत नाही कधी कोण पुढे येईल तर कधी एकदम खाली जाईल कधी मनात नसतानाही एकादे मोठे पद मिळेल राजकारणात अपमान सहन करावा लागतो, राजकारण सोपा विषय आहे. गावासाठी, तालुक्यासाठी कितीही काम केले तरी एकादा तरी माणूस टिका करणारा भेटतो कारण सगळ्याचे समाधान करता येत नाही. आता मोहोळ मध्ये हेच चालु आहे. कारण नसताना टिका करण्याचे काम चालू आहे हे चुकीचे आहे. मालकासाखे नेतृत्व तुम्हाला मिळाले आहे तुमचे नशिब आहे. त्यांच्याकडून लिनता शिकावी तरी देखील लोक टिका करतात यालाच राजकारण म्हणायचे. राजकारणात चांगल्या आणि वाईटाची किंमत जर सारखीच होत असेल तर हे चुकीचे आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे. राजकारणात मतलबी मंडळी जास्त झाली पुढे पुढे करायचे आणि आपले काम साधुन घ्यायचे अशी राजकारणात अनेक माणसे आहेत. श्रेष्ठीने विचार केला पाहीजे. यावेळी सुत्रसंचालन सागर यादव यांनी केले तर आभार अविनाश मार्तंडे यांनी मानले.

error: Content is protected !!