ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

*”मनोज आव्हाड यांच्या मारेकऱ्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी.* *रमेश तात्या गालफाडे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी मनोजच्या कुटुंबियासह प्रचंड धरणे आंदोलन.*

केज! प्रतिनिधि!

दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी सिडको ऐन बारा या ठिकाणी नामे मनोज शेषराव आव्हाड वय वर्ष 27 या इसमास काही समाजकंटकांनी चोरीच्या संशयावरून कट रचून बेदम मारहाण केली होती त्यामध्ये मनोज चा मृत्यू झाला आहे.सदरील घटनेच्या मारेकर्‍यांनी माणुसकीचा कळस ओलंडला आहे निरआपराध मनोजला त्यांनी कुठला हि विचार न करता दंड्यांनी अमानुषपणे मारहाण केली व जिव जाई पर्यंत मारले व मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण करून तो व्हिडिओ वायरल केला त्या व्हिडिओमध्ये मनोज आपला जिव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे . मारहाण करणाऱ्या आरोपीना दयावया करत आहे. तरी पण या मारेकऱ्यांना त्याची दया माया आली नाही. ते मारहाण करून त्याला मंगल कार्यलया जवळ सोडून निघून गेले चार तास नंतर मारेकऱ्या मधील ऐका व्यतीने येऊन बघीतले तर मनोज ची हालचाल बंद झाली होती. त्याने तातडीने कटात सामील असलेल्या सर्व आरोपींना फोन करून माहीती दिली त्या मधील काही मारेकरी आले त्यांनी मनोज ला शासकिय रुग्णालय घाटी या ठिकाणी नेले तो पर्यंत त्याचा मत्यू झाला होता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 25 रोजी रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी आव्हाड कुटुंबासह धरणे आंदोलन केले व परिवाराचे सांत्वन केले परिवाराला धीर देत त्यांनी अकरा हजाराची तातडीची मदत धनादेशाद्वारे मयताच्या पत्नीस दिले तेवढ्यावरच न थांबता श्री गालफाडे यांनी सदरील खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालून या केसला सरकारी वकील श्री उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल व मारेकऱ्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल व या कुटुंबाला कुठल्या प्रकारची उणिव भासू देणार नाही असे त्यांनी सांगितले वेळप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री मुंबई पोलीस महासंचालक यांच्याशी सुद्धा चर्चा करून सदर घटनेमध्ये आणखी कलम लावून मारेकऱ्यांना कठोर शासन होईल ते प्रयत्न मी माझ्या सर्व समाज बांधवांच्या वतीने करणार आहे असे जेष्ठ समाजसेवक तथा बहुजन रयत परिषदेचे प्रदशाध्यक्ष, गालफाडे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मा. रमेश गालफाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!