ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

केज येथील युवा ग्राम विकास मंडळाचे सचिव व त्यांच्या टीमने दहा वर्षाने हरवलेल्या माय लेकीची आणली भेट घडवून

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

केज येथील युवा ग्राम विकास मंडळाचे सचिव व त्यांच्या टीमने दहा वर्षाने हरवलेल्या माय लेकीची आणली भेट घडवून

किल्ले धारूर (प्रतिनिधी):-प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे एप्रिल 2018 मध्ये माननीय न्यायाधीश नागपूर यांच्या आदेशाने एका महिला मनोरुग्णास भरती करण्यात आले उपचाराने स्थिराव आल्यावर तिच्याकडून तिच्या नातेवाईक आणि घरचा पत्ता विचारण्यात आला. मात्र बोलण्यात अस्पष्टता होती. तिची बोलण्याची प्रकृती पाहून एके दिवशी सांगितले त्यानुसार तिच्या नावावरून सांगितलेल्या गावचा शोध घेण्यात आला आणि खरी कहाणी उलघडू लागली व खरे वास्तव्य समोर आले.
सदर महिला ही मौजे कोरडेवाडी तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवासी असून दोन मुली व एक लहान मुलगा मिळेल ते खाऊन कोठेही आडोशाला राहायचे. आई मनोरुग्ण असल्याने ना मुलाची काळजी ना अंगावर पुरेशी कपडे असायचे हे वास्तव्य गावातील सर्व बघायचे पण कोणी मदतीला धावले नाही. ही माहिती त्या गावात बाहेरून नोकरी करणाऱ्या शिक्षिकेला बघवली नाही. तिने तिच्या दोन मुलीस युवा ग्राम विकास मंडळ संस्थे अंतर्गत चालत असलेल्या अक्षय बालगृहात दाखल करण्यासाठी तत्कालीन बालगृह अधीक्षिका सौ शिंधू जाधव यांना संपर्क करून अक्षय बालगृहात दाखल केल्या. त्या मुलींना पुढे आईचे नाव लावले. पुढे ही मनोरुग्ण महिला आपल्या लहान मुलाला घेऊन कुठेतरी भटकली आणि गावात असा निरोप गेला की या महिलेचा मृत्यू झाला आणि मुलाला बाल कल्याण समिती बीड यांनी कायदेशीर रित्या दत्तक दिल्याचे समजते याची सातत्यात अद्याप समजली नाही. मोठ्या मुलीचे लग्न युवा ग्राम विकास मंडळ कार्यकारी सचिव आदरणीय श्री एच पी देशमुख यांनी योग्य वर शोधून 2017 साली लावून दिले. तर दुसऱ्या मुलीला इयत्ता दहावी पर्यंत शिकवून तिला हेल्थकेअर कोर्स करिता पुणे येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊन दिला. अद्याप दोन मुलीला आई सापडली पण भावाची भेट अधुरी आहे.
अचानक केज पोलीस स्टेशन मधून फोन आला आणि आई सापडली ही बातमी मिळाली. युवा ग्राम विकास मंडळ संस्थेला आणि त्या दोन मुलीला हा आनंद गगनात मावेना एच पी देशमुख व युवा ग्राम टीम यांनी लगेच केज पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार व पोलीस उपनिरीक्षक वाघमारे साहेब यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सविस्तर सांगितले की प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथून समाजसेवा अधिक्षक श्रीमती बिडकर यांनी फोनवर अशी माहिती दिली किष्किंधा नावाची मनोरुग्ण आमच्याकडे 2018 पासून आहे तिचे कोणी नातेवाईक असतील तर येऊन तिला घेऊन जावे.
दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी युवा ग्राम टीम मनोरुग्णालय नागपूर येथे पोहचली एवढ्या वर्षांनी अचानक मुलीला समोर पाहून मे लेकीचे डोळे पाणावले. या मनोरुग्णाचा पत्ता शोधणे तिची आणि मुलीची भेट घडवून आणण्यात समाजसेवा अधिक्षक श्रीमती बिडकर यांची महत्वाची भूमिका राहिली.
नागपूर येथून या किश्किंदा वरपे यांना निरोप देताना प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सतीश हुमणे, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. करोडे, मानसोपचार तज्ञ डॉ. कुथे, डॉ. बागडे, मेट्रन श्रीमती ठाकरे, युवा ग्राम विकास मंडळ कार्यकारी सचिव एच पी देशमुख, हिराबाई शेळके – शिक्षिका जिल्हा परिषद कोरडेवाडी, उपस्थितीत होते तर या माय लेकीस भेट घडवून आणण्यासाठी कल्पना जगदाळे, प्रकाश काळे, संतोष रेपे, संभाजी वलशे,राहुल देशमुख, सुनिता विभूते, सिंधू जाधव आदि व्यक्तींनी मोलाचे परिश्रम घेतले.

घरात जर कोणी मनोरुग्ण अथवा मतीमंद व्यक्ती असला तर घाबरून न जाता त्यांचेवर तज्ञ डॉक्टर कडून उपचार करून घ्यावा तसेच त्यांच्या सोबत वेळ घालवावा, त्याला कुटुंबातील दैनंदिन कार्यात सहभागी करून घ्यावे आणि आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यांच्या हातावर मोबाईल नंबर गोंदवून घ्यावा व तसेक वेळोवेळी तज्ञाचा सल्ला घ्यावा. – वैद्यकीय अधिक्षक डॉ. सतीश हुमणे – प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर

आज आशा चे लग्नयुवा ग्राम विकास मंडळ केज ही सामाजिक संस्था गेल्या ३८ वर्षापासून समाजात ग्रामीण विकासाबरोबर महिलांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, शेती, शेतीचे पाणी पिण्याचे पाणी, समाजातील दुर्लक्षित प्राणी, आशा विविध विषयावर धर्मादायपणे काम करत आहे.युवा ग्राम विकास मंडळ अंतर्गत लहान मुलांचा सर्वे चालू असताना सिंधू जाधव यांना दोन मुली व एक मुलगा आणि आई आशा व्यक्तींची भेट झाली. दोन मुली व एक लहान मुलगा मिळेल ते खाऊन कोठेही आडोशाला राहायचे. आई मनोरुग्ण असल्याने ना मुलाची काळजी ना अंगावर पुरेशी कपडे असायचे हे वास्तव्य गावातील सर्व बघायचे पण कोणी मदतीला धावले नाही. ही माहिती त्या गावात बाहेरून नोकरी करणाऱ्या शिक्षिकेला बघवली नाही. तिने तिच्या दोन मुलीस युवा ग्राम विकास मंडळ तत्कालीन कर्मचारी सौ शिंधू जाधव यांना संपर्क करून त्यांना संस्थेच्या बालगृहात अक्षय बालगृहात प्रवेश करून दिला. त्या मुलींना पुढे आईचे नाव लावले. पुढे ही मनोरुग्ण महिला आपल्या लहान मुलाला घेऊन कुठेतरी भटकली आणि मुलाला बाल कल्याण समिती बीड यांनी कायदेशीर रित्या दत्तक दिल्याचे समजते याची सत्यता अद्याप समजली नाही. मोठ्या मुलीचे लग्न युवा ग्राम विकास मंडळ कार्यकारी सचिव आदरणीय श्री एच पी देशमुख यांनी योग्य वर शोधून 2017 साली लावून दिले. तर दुसऱ्या मुलीला इयत्ता दहावी पर्यंत शिकवून आज तिचेही लग्न आष्टी येथील एका चांगल्या कुटुंबात जमवून विवाह सोहळा आज संपन्न होत आहे. या लग्नाची सर्व जिम्मेदारी युवा ग्राम विकास मंडळ संस्थेचे कार्यकारी सचिव एच पी देशमुख व युवा ग्राम टीम करीत आहे.या लग्न कार्यासाठी कल्पना जगदाळे, बी के कापरे, प्रकाश काळे, सुनिता विभुते, संतोष रेपे, राहुल देशमुख, संभाजी वलशे, हिराबाई शेळके, द्वारकाबाई थोरात, आदि. व्यक्तींनी परिश्रम घेतले

error: Content is protected !!