ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाशिवरात्रीनिमित्त आस्था रोटी बँकेच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथे फराळाचे वाटप.

सोलापूर मध्ये विविध ठिकाणी फराळाचं वाटप.

आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीने
सिव्हिल हाॕस्पिटलमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना महाशिवरात्री निमित्ताने फराळ व फळ वाटप व बाळवेस येथील हनुमान मंदिर च्या शेजारी महाप्रसाद वाटप करण्यात आले आहे.
महाशिवरात्री भगवान शिव व माता पार्वती यांचा विवाह दिवस भारतात  हा दिवस खुप मोठया उत्साहात भक्ती भावाने श्रध्देने साजारा केला जातो.
भक्त गण दिवसभर जमेल त्या मार्गने उपवासाने शिवभक्ती करतात
परंतु सिव्हिल हाॕस्पिटल मध्ये उपचाराकरिता आलेल्या 400 लोकांना फराळ वाटप करण्यात आले आहे व रुग्णांच्या नातेवाईकांना दररोजच उपवास घडतोच देवाला आठवण करावी लागते प्रसन्न करुन घ्यावे लागते .कारण त्या अश्या परिस्थितीतून स्वतः व इतरांचे मनोबल वाढवत असतात आपला रुग्ण लवकर बरा व्हावा व लवकर कुटुंबांसोबत आनंदीत राहावा हीच सोबत असलेल्या नातेवाईंची धडपड असते.
प्रचंड मानसिक आर्थिक शारिरीक त्रासदायक परिस्थितीतून जात असतो त्याला आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे मोफत महाशिवरात्री निमित्ताने उपवासाचे फराळ पदार्थ खिचडी व फळ वाटप करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यामागे भावना हिच होती की सोलापुरात तुम्ही आमच्या कडे पाहुणे म्हणून आले आहात व आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे अथिती देवो भवो तर रुग्णांना जोपासताना त्यांनी स्वतंःची पण काळजी घ्यावी वेळ प्रसंगी एक मदतीचा हात तुमच्या सोबत कायम असेल हा विश्वास त्यांना वाटावा हिच होती.
फराळ वाटप कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आस्थाच्या सभासद स्नेहा वनकुद्रे,ज्योत्स्ना सोलापूरकर, अनिता तालिकोटे, स्नेहा मेहता व सामाजिक कार्यकर्ते विनायक विटकर, राजू हौशेट्टी , राजू विजापूर, अनिल वजीरकर, योगेश कुंदुर, मिथुन शहा, पुष्कर पुकाळे गणेश कोरे, विपुल कुलकर्णी, सुष्शांत खंदारे, करिकर प्रसाद बद्दूरकर, राजेश वर्धेकर, नागेश मंजिल, दिनेश दांडगे, नितीन भांडेकर,  उपस्थितीत होते
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रथम भोलेनाथ ची पूजा करण्यात आली व बाळवेस येथे शंकर भगवान चे पूजन करण्यात आले त्यावेळी विनायक विटकर, आस्था फाउंडेशनचे मार्गदर्शक राजू हौशेट्टी, योगेश कुंदुर, गणेश कोरे, पुष्कर पुकाळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!