ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

संत वीरशैव कक्कया महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्डीमध्ये जनावरांच्या पाणपोईची सुरुवात

सोलापूर संपादक- महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभूते

मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथे निर्मल हृदय दादा प्रतिष्ठान चे संस्थापक संजय खरटमल यांच्या वतीने मार्डी परिसरातील मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता मार्डी होनसळ रस्त्यावरती हॉटेल राम लखन या ठिकाणी महाराष्ट्राचे शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते संत कक्कया महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पाणपोई जनावरांसाठी खुली करून दिली.
यावेळी शिवरत्न शेटे यांनी आपल्या मनोगतामध्ये मनुष्याला व्यक्त होता येत परंतु जनावरांना व्यक्त होता येत नाही हे ओळखून मार्डी येथील संजय खरटमल यांनी हे महान कार्य केले आहे. ते कार्य अतिशय उल्लेखनीय असून, यापूर्वी देखील त्यांनी नरोटेवाडी, मार्डी नान्नज रस्ता ,मार्डी कारंबा रस्ता या ठिकाणी जनावरांच्या पाणपोई सोय केलेली आहे हे सांगितलेे यावेळी सेवालाल नगरचे माजी सरपंच संजय वडजे ,बाळासाहेब पाटील,शिवाजी सोनार, युवराज पवार.जगन्नाथ काशीद भगवान तात्या कदम, प्रशांत काशीद, दादा पाटील, अरुण महापुरे, लखन वडजे, राम वडजे,पिंटू सुर्ते व प्रतिष्ठानचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

भगवान गडचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांसाठी ज्याप्रमाणे संजय खरटमल यांनी पाणपोई उपलब्ध करून दिली अशीच कार्य त्यांच्या हातून घडत राहो व समाजातील लोकांनी आदर्श घेत त्यांनी सुद्धा या सामाजिक कार्यामध्ये भाग घ्यावा असे दूरध्वनी वरूनआव्हान केले.

error: Content is protected !!