ब्रेकिंग न्युज
आज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधवअरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूरलोकशाही व बलशाली भारतासाठी आपले कर्तव्य म्हणून मतदान करा : डॉ. संजय भोरेशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड संस्थेत मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या आवाहनानुसार लोकशाहीचा उत्सव अहमदनगर जिल्हा मिशन 75 साध्य करण्यासाठी सक्रिय योगदानाचा संकल्प. .लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी मतदारांची पाटोदा तालुक्यातील अंमळनेर , पिंपळवंडी , उंडेवाडी , साबळेवाडी, पांढरवाडी , गांधणवाडी, कोतन , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बालेकिल्ले – संतोष आप्पा पोकळेपंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवले

अट्टल महाविद्यालयात भारत सरकारचा स्वच्छता आणि मतदार जागृती उपक्रम

अट्टल महाविद्यालयात भारत सरकारचा स्वच्छता आणि मतदार जागृती उपक्रम

गेवराई, दि. २८ प्रतिनिधी;- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शहिद दिनानिमित्त ‘स्वच्छता अभियान आणि मतदार जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.
भारत सरकार युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय तथा राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रिय निदेशालय, पुणे आणि संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शहिद दिनानिमित्त मतदार जनजागृती आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे या उपस्थित होत्या. डॉ. प्रवीण सोनुने यांनी विषय तज्ञ म्हणून विद्यार्थ्यांना मतदार जनजागृतीवर अनमोल मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना मतदार म्हणून शपथ दिली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, प्रा. शरद सदाफुले, ग्रंथपाल डॉ. रणजीत पागोरे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. समाधान इंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संचालक डॉ. सोनाली क्षीरसागर आणि कार्यालयीन कर्मचारी श्याम बंसवाल यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!