ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

मस्सा जोग जवळ भिषण अपघात.

मस्सा जोग जवळ भिषण अपघात.
केज!प्रतिनिधी;-केज तालुक्यातील मस्साजोग येथे दोन कारचा अपघात झाला. या दोन्ही कार दूर अंतरावर जाऊन पलटी झाल्या असून यामध्ये किती जखमी झाले याबाबत सविस्तर माहिती समोर आली नसून हा अपघात सायंकाळच्या सुमारास घडला. आहे.
तालुक्यातील मस्साजोग पासून केजकडे जाणार्‍या रस्त्यावर एका पुलावर उतार असल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होऊ लागलेले आहेत. आणि त्याच ठिकाणी पुन्हा आज (दि.२७) सायंकाळच्या वेळेला दोन चार चाकी वाहनांचा अपघात झाला असून वाहनांचा अगदी चक्काचूर झाला आहे. मात्र यामध्ये किती लोक जखमी झाले आहेतया अपघातात जखमी झालेल्या बोबडे पिता- पुत्रास भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी स्वत:च्या गाडीतून आणले व बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सूर केले आहेत.भाजपा – महायुतीचे उमेदवार, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ केज येथील आयोजित कार्यकर्ता बैठक पार पडल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के बीडकडे येत असताना कारेगाव फाटा येथे जमलेली गर्दी पाहून गाडी थांबवली. रस्त्यालगत असलेल्या साधारण पंधरा फुट नालीत पडलेल्या रेनॉल्ट डस्टर गाडीत बोबडे पिता-पुत्र अडकले होते. तातडीने राजेंद्र मस्के व त्यांच्या सहकारी चंद्रकांत फड, बालाजी पवार, अनिल शेळके, सोनू गायकवाड, अविनाश नवले यांनी गाडी बाहेर काढून त्यांची विचारपूस करून धीर दिला व स्वत:च्या गाडीतून तातडीने बीड येथे आणून जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले. बोबडे पिता-पुत्राची प्रकृती स्थिर असून सुखरूप आहेत. वेळेवर मदत केल्यामुळे बोबडे कुटुंबीयांनी राजेंद्र मस्के यांचे आभार मानले.
error: Content is protected !!