ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

अट्टल महाविद्यालयात भारत सरकारचा स्वच्छता आणि मतदार जागृती उपक्रम

अट्टल महाविद्यालयात भारत सरकारचा स्वच्छता आणि मतदार जागृती उपक्रम

गेवराई, दि. २८ प्रतिनिधी;- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शहिद दिनानिमित्त ‘स्वच्छता अभियान आणि मतदार जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.
भारत सरकार युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय तथा राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रिय निदेशालय, पुणे आणि संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शहिद दिनानिमित्त मतदार जनजागृती आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे या उपस्थित होत्या. डॉ. प्रवीण सोनुने यांनी विषय तज्ञ म्हणून विद्यार्थ्यांना मतदार जनजागृतीवर अनमोल मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना मतदार म्हणून शपथ दिली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, प्रा. शरद सदाफुले, ग्रंथपाल डॉ. रणजीत पागोरे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. समाधान इंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संचालक डॉ. सोनाली क्षीरसागर आणि कार्यालयीन कर्मचारी श्याम बंसवाल यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!