ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

*लोकसभेसाठी मतभेद बाजूला विसरून सोनवणे बंधू एकत्र* *गळाभेट घेत आघाडी धर्म पाळण्याचा दिला संदेश* ————————————

 

केज :- तुतारीच्या सोबतीला हाताची साथ आहे. यात कोणीही शंका घेण्याची गरज नाही. असा स्पष्ट संदेश दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील व बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या भेटीतून जनतेत गेला आहे. तर काँग्रेसचे युवा नेते राहुल सोनवणे व बजरंग सोनवणे या दोघा सोनवणे बंधूंनी गळाभेट घेत आपल्या समर्थकांना दिलेला दिलजमाईचा संदेशही चर्चेचा विषय ठरला आहे.

 

केज नगरपंचायतीच्या व सारणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बजरंग सोनवणे व राहुल सोनवणे हे एकमेकांच्या राजकीय विरोधकांच्या भूमिकेत दिसून आले होते. या दोन्ही निवडणुकीनंतर दोघे एकत्र आले नव्हते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून बजरंग बप्पा सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आय सोबत असण्याबद्दल कोणाचेही दुमत नव्हते. परंतु काँग्रेस नेत्या खा. रजनीताई पाटील यांचे अत्यंत विश्वासू असलेले राहुल सोनवणे व बजरंग सोनवणे यांचे संबंध मागील काही निवडणुकांमधून ताणले गेले होते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे राजकीय जाणकारांचे लक्ष होते.

 

दोन दिवसांपूर्वी बजरंग सोनवणे यांनी खा. रजनीताई पाटील यांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी उपस्थित असलेले राहुल सोनवणे व भेटीसाठी आलेले बजरंग सोनवणे या दोघांनीही राजकीय परिपक्वतेचा परिचय देत कोणतीही चर्चा न करता एकमेकांची गळाभेट घेतली. या गळाभेटीतून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आता एकत्रित काम करायचे आहे. असा संदेश दिला आहे. एकूणच दोघांच्या एकत्रित येण्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना होणार आहे.

error: Content is protected !!