ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मराठी भाषा दिनविशेष| संवर्धन मराठी भाषेचे

मराठी भाषा दिनविशेष

संवर्धन मराठी भाषेचे

माझी माय मराठी असे आपण सहज बोलतो. मराठी भाषा आपल्या दैनंदिन व्यवहारातील अविभाज्य भाग आहे. उद्या मराठी राजभाषा दिनानिमित्त सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या मीडिया अकॅडमीने त्यांच्या मिडीयाच्या विद्यार्थ्यांना जपूया मराठी भाषेला या विषयावर मत व्यक्त करायला सांगितले त्यातील खास प्रतिक्रिया तुमच्यासाठी.

दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रख्यात मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस राज्यातील मराठी भाषिकांनी समृद्ध इतिहासाचा आणि त्याच्याशी निगडित साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. ।। जय महाराष्ट्र ।।
कविता चौधरी
८ वी
साधना विद्यालय इंग्रजी माध्यम

मराठी भाषा आपली मायबोली आहे म्हणजेच मातृभाषा आहे. लहानपनापासून आपण ऐकत आलोय व बोलतोय. महाराष्ट्रात विविध प्रकारे मराठी भाषा बोलली जाते. मराठी भाषा आपली स्मिता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मराठी भाषा जपायला हवी.
मयुरी मनोहर खडमले
८वी
अनुयोग विद्यालय

आजच्या जगात मराठी भाषेला जपणे खूप आवश्यक आहे. कारण आज सर्वच इंग्रजी भाषाकडे आकर्षित होत आहे व मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे परंतु, दुसऱ्या भाषा शिकताना आपल्याला मराठी भाषेचा विसर पडता कामा नये, नाही तर मराठी भाषा संपुष्टात येईल. जपूया मराठी भाषा!
श्रुती गुलाब गायकवाड
९ वी
विद्या वकास मंडळ विद्यालय, अंधेरी पश्चिम.

आजच्या युगात आपल्या मराठी भाषेला आपण जपलं पाहिजे कारण ती कुठेतरी गायब होत चालली आहे. सर्वांनी मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात आनंदाने केला पाहिजे जेणेकरून मराठी भाषा जपली जाईल व आपली संस्कृती टिकेल.
पियुष भोस्टेकर
इ. ९ वी
लायन्स पायोनीअर स्कूल

पहिली गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्याला मराठी भाषा ही बोलता आलीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मराठी भाषिक आहोत याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे तरच मराठी भाषा जपली जाईल.
राबिया रैनी
इ.९ वी
गुंदवली स्कूल

आपली मातृभाषा जपणे हे आपले कर्तव्यच आहे . आणि आजच्या या तरूण पिढीने मराठी भाषेचा दर्जा कमी करून इंग्लिश भाषेला खूप वाव दिला आहे . तर हा आपल्या मातृभाषेचा अपमानच झाला , मग आपण हा मराठी भाषेचा झालेला अपमान थांबवू. मराठी भाषेचा पुन्हा नव्याने उदय करू व मराठी भाषेचे संवर्धन करु
यश रमेश कांबळे
८वी
अनुयोग विघ्यालय

मराठी भाषा आम्हाला शालेय अभ्यासात शिकवली जाते. पण शालेय शिक्षणानंतर आपण सर्व इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणावर वापरतो. आज हि आम्ही बोलताना सहज इंग्रजी शब्द जास्त वापरतो. मराठी भाषा जपणे हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि ती जपण्यासाठी आपण मराठी पुस्तकांचे वाचन करणे आणि त्यातील शब्दांचा वापर करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
अथर्व खडके
८ वी
ना. म. जोशी शाळा

आमृताहून गोड आहे माझी मराठी भाषा . माझ्या मराठी भाषेचा मला अभिमान आहे. पण या माझ्या मराठी भाषेला मनाचे स्थान मिळताना आजतरी दिसत नाही. मराठी शाळा बंद होऊन या शाळांची जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतली आहे. कारण काय तर…… इंग्रजी माध्यमात सर्व काही आहे म्हणून आपली मराठी भाषा मागे पडत आहे. जर सर्व पालकांनी आपल्या मुलांना मुलींना मराठी माध्यमातून शिकवले तर नक्कीच आपली माय मराठी खूप पुढे जाईल.
पूर्वा संजय निकम
८ वी
अनुयोग विद्यालय

संकलन:- रेश्मा आरोटे

error: Content is protected !!