ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

काँग्रेसने निर्णय घेतला नाही म्हणून वडिलांनी आत्महत्या केली; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसवर आरोप लागवल्यानंतर आता अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप लगावला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेसची सत्ता असताना दिवंगत माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मांडला. मंत्रालयावर १९८२ साली मोर्चा काढला होता.

मात्र, त्यानंतर कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. अण्णासाहेब पाटलांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी काँग्रेसने कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून आत्महत्या केली, असा गंभीर आरोप कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते बीड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आता त्यांच्या या आरोपामुळे राज्यतील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

माझे वडील काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार होते. त्यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर काहीच निर्णय घेतला गेला नाही. मराठा आरक्षणासाठी १९८२ साली काँग्रेसने कोणतीच समिती स्थापन केली नाही आणि म्हणून वडिलांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला.

error: Content is protected !!