ब्रेकिंग न्युज
शारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागर

प्रशांत पोरवाल यांच्या कडून विश्वकल्याण सेवाभावी संस्थेला धान्य व किराणाची मदत मोफत भोजनाचा अखंडित महायज्ञ चालूच.

प्रशांत पोरवाल यांच्या कडून विश्वकल्याण सेवाभावी संस्थेला
धान्य व किराणाची मदत मोफत भोजनाचा अखंडित महायज्ञ चालूच.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
कोरोणाच्या लाटेमध्ये लाँगडाऊमूळे अनेक कुटुंबे बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. मोठी दुकाने बंद आहेत परंतु त्यांचे मालक तग धरून आहेत. छोटे व्यवसायिक उधार उसनवारीने कसेबसे आपले दिवस पुढे रेटत आहेत. जे रोज दारावर जाऊन वस्तू विकतात अशा भटक्या लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गल्ल्या बंद आहेत, दारे बंद आहे. सरासरी कुणी कुणाच्या वस्तूला हात लावायला धजावत नाही. परिणामी उपासमारीची पाळी या लोकांवर येत आहे. शहराबाहेर पाल करून राहणार्या वस्त्या अगोदरच दुर्लक्षित आहेत.या काळात यांच्याकडे व्यवसाय नाही. गावात घर नाही आणि शिवारात शेत नाही आणि कोणी ओळखतही नाही. उत्पादनाचे साधनच बंद आहे. खायचं काय हा एकच प्रश्न यांच्या समोर आ वासून उभा आहे.
विश्वकल्याण सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा किस्किंदाताई पांचाळ यांनी बीड शहराच्या बाहेर जाऊन त्यांची चौकशी केली तेव्हा वास्तव समोर आले. लेकरं बाळं कसेतरी भीक मागून जगतवतोय सध्याला भिकही कोणी वाढत नाही. कधी कधी पाणी पिऊन पुढच्या दिवसाची आशेने वाट पाहावी लागत आहे.अतिशय विकट अवस्थेतून हा समाज आला दिवस पुढे ढकलत आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटना आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून विश्वकल्याण सेवाभावी संस्थेने या पालावरच्या लोकांना दररोज जेवण देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. दररोज तीनशे माणसांचा कुटुंबकबिला ही संस्था चालू लागली आहे. तर आज या पालावरच्या लोकांच्या जेवणासाठी बीड शहरातील गोरगरिबांचे कैवारी प्रशांत पोरवाल, शिवम पोरवाल, स्वयंम पोरवाल , यांच्याकडून किस्किंदा ताई पांचाळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तीनशे माणसांचा स्वयंपाक करण्यासाठी दररोज 20 ते 25 माणसे झटत आहेत. काहीजण सेवाभाव म्हणून मदत करत आहेत तर काही तुटपुंजा पगारावर हे काम करत आहेत. लॉकडाउन संपेपर्यंत त्यांचा हा अन्नदानाचा यज्ञ चालू राहणार आहे. सर्वांनी या महत पुण्याच्या कामासाठी मदत करणे गरजेचे आहे. कोरोणाच्या काळात आपल्याला माणसं जगवायची आहेत. त्यांना अन्नाबरोबरच हिंमतही द्यायची आहे.
याप्रसंगी विश्वकल्याण सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा किस्किंदाताई पांचाळ, स्वीय सहाय्यक समाधान पांचाळ, दिगंबर पांचाळ, कालिदास देशमुख, शांताबाई कदम, कुसुमबाई शिंदे, कौसाबाई सुरवसे, इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!