ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

केज नगरपंचायत अंतर्गत ५००, लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घघाटन सोहळा. ” मा. आ. सौ, नमिता ताई मुंदडा यांच्या हस्ते होणार उद्घघाटन…..! “निर्धार नगरपंचायतचा कायापालट केज शहराचा- मा. हारूणभाई इनामदार.

केज नगरपंचायत अंतर्गत ५००, लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घघाटन सोहळा.

“मा.आ. सौ,नमिताताई मंदडा यांच्या हस्ते होणार उद्घघाटन…!

“निर्धार नगरपंचायतचा कायापालट केज शहराचा – हारूण भाई इनामदार.

केज ! प्रतिनिधी !

केज नगरपंचायतमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीची सत्ता आल्यानंतर आघाडीचे सर्वेसर्वा मा. हारूण भाई इनामदार व नगरपंचायतच्या धडाडीच्या, कार्यतत्पर,विद्यमान नगराध्यक्षा सौ, सिताताई बनसोड यांनी अहोरात्र परिश्रम घेवून सर्वांना सोबत घेवून अगदी एक निश्चयाने केज शहराचा विकास करून शहराला अगदी सुंदर बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे “आपला गाव आपला विकास” हे ध्येय, संकल्प समोर ठेवून जनविकास परिवर्तन आघाडीचे मा. हारूण भाई इनामदार यांनी सर्वांच्या सहकार्याने तसेच केज मतदार संघाच्या आ. मा.सौ,नमिताताई मुंदडा यांच्या सहकार्याने “न भूतो न भविष्यती” असा जवळपास १०० कोटी रुपयांचा निधि केज शहराच्या विकासासाठी मंजूर करून घेतला, याचाच एक भाग म्हणून दि,२९, मार्च रोज बुधवार या दिवशी मा.आमदार सौ, नमिता ताई मुंदडा यांच्या हस्ते ५००,लक्ष रुपयांच्या विकास कामाचा उद्घघाटन सोहळा व बांधकाम मजूरांना किट वाटपाचा जाहिर कार्यक्रम केज शहरात आयोजीत केलेला आहे जन विकास आघाडीने नेहमीच केज शहराच्या विकास कामावर भर दिला आहे दि.२९मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता नगरपंचायत कार्यालय केज येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश आडसकर हे राहणार असून भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा,युवा नेते अक्षयजी मुंदडा,कृ.उ.बा.स. माजी सभापती मा. अंकुशराव इंगळे,जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा मा हारुणभाई इनामदार, केज शहराचे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री शरद झाडके,तहसीलदार श्री दुलाजी मेंडके,मा.सरपंच श्री युवराज दादा काळे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केशव कदम, न.प चे गटनेते,राजुभाई इनामदार,न.प.गटनेते (राष्ट्रवादी)  रामचंद्र गुंड,ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,शिवसेना ता.प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे,पशुपतीनाथ दांगट, दिलिप गुळभिले,भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार,डॉ.वासुदेव नेहरकर,डॉ,त्र्यंबट चाटे,रिपाइंचे ता.अध्यक्ष दीपक कांबळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी हे असतील दरम्यान,पहिल्या टप्प्यात ५०० लक्ष रुपयांच्या विकास निधीतून केज शहरातील मुलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात असणार आहे.केज शहराच्या विकासासाठी सुजाण नागरिक आणि जनतेनी मोलाची साथ द्यावी पाच वर्षात केज शहर एक सुंदर आणि स्वच्छ शहर करून दाखवणार केजच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेवून सर्वांना बरोबर घेवून सर्वांच्या सहकार्याने शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे जनविकास आघाडीचे प्रमुख मा. हारूण भाई इनामदार यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच नगरपंचायत अंतर्गत ५ कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ सोहळा व बांधकाम मजुरांना किट वाटपाच्या कार्यक्रमाला केज शहरातील सुजाण नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केज नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ,सीताताई बनसोड,उपनगराध्यक्षा सौ,शीतलताई दांगट,नगरपंचायतचे मुख्याधिकारी महेश गायकवाड,सर्व सभापती,नगरसेवक,व कर्मचारी,नगरपंचायत कार्यालय केज यानी केले आहे.

error: Content is protected !!