ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेला 10 मिनिटे वेळ वाढवून मिळणार

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेला 10 मिनिटे वेळ वाढवून मिळणार

पुणे (प्रतिनिधी):-10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना दहा मिनिट एक्स्ट्रा मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि ते नीट समजून घेण्यासाठी वेळ वाढवून मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.

या निणर्यामुळे मुलांना फायदा होणार आहे. या पूर्वी परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी तसेच परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी 10 मिनिटे आधी केल्या जात होते.

10वी आणि 12 वीच्या परिक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून या परीक्षेची जोरदार तयारी सुरु आहे. बारावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालवधीत होणार आहे.

या परीक्षा या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात घेतल्या जाणार आहेत. सकाळच्या सत्रात 11 वाजता पेपर सुरू होणार असल्याने मुलांना 10.30 वाजता दालनात हजर राहावे लागणार तर दुपारी 3 वाजता पेपर सुरू होणार असल्याने 2.30 वाजता हजर राहावे लागणार आहे. तसेच 11 च्या पेपरला 2 ऐवजी 2.10 असा वाढीव 10 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.

बोर्डाच्या या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे मुलांसह पालकांना देखील या परीक्षेची काळजी असते. पूर्वी मुलांना उत्तर पत्रिका नीट वाचून समजून घेता यावी तसेच त्याचा अंदाज घेता यावा यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिकेचे वाटप केले जात होते. मात्र पेपर फुटीच्या घटना घडल्यामुळे निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची पद्धत गेल्या वर्षीपासून रद्द करण्यात आली होती. अशात विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका वाचून पेपर सॉल्व करण्यास उशीर होत होता. मुलांना वेळ कमी पडत असल्याचे लक्षात घेऊन परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर मुलांना आणखी 10 मिनिटे वाढीव वेळ दिला जाणार आहे.

error: Content is protected !!