ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

Lok Sabha Election 2024: ‘…तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करू’, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

Lok Sabha Election 2024: ‘…तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करू’, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. यातच देशात सात टप्यात तर राज्यात पाच टप्यात निवडणूक पार पडणार आहे. यातच बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीड पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. जिल्ह्यातील जे संवेदनशील गाव आणि बूथ आहेत, त्या गावात जाऊन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे बैठक घेऊन आढावा घेत आहेत.

बीडच्या लिंबागणेश गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान फेव्हीस्टिक टाकून ईव्हीएम मशीन खराब करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा निवडणूक घेण्यात आली. यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज बीडच्या लिंबागणेश गावांमध्ये बैठक घेत आढावा घेतला आहे.

”जर लोकशाहीला मारक अशा घटना घडल्या तर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल”, असा इशारा यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आढावा बैठकीतून दिला आहे.

दरम्यान, देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी २१ राज्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे रोजी, पाचव्या टप्प्याचे २० मे रोजी, सहाव्या टप्प्याचे २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे.

तसेच राज्यात पहिला टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर येथे मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीला मतदान होईल. तिसरा टप्प्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेला मतदान होईल. चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथे मतदान होईल. तर पाचवा टप्प्यात २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होईल.

error: Content is protected !!