ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

परभणी जिल्हासह हिंगोली नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे ४.२ रिकटर स्केलचे जाणवले धक्के

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

परभणी जिल्हासह हिंगोली नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे ४.२ रिकटर स्केलचे जाणवले धक्के

नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. गुरुवार सकाळी सव्वासहाच्या दरम्यान हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रत ४.२ एवढी मोजली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हासह हिंगोली नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे ४.२ रिकटर स्केलचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्हातील आखाडा बाळापूर असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाचे धक्के हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हात जाणवले असून प्रशासनाकडून अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

भूकंपाचे दोन धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्यातील तीव्रता जास्त असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक देखील घराबाहेर पडले.

नांदेड शहरासह अर्धापूर , भोकर , हदगाव , नायगाव, मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे धक्के जाणवले. काही गावातील घरांच्या भिंतींना देखील तडे गेले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरी, वसमत, औंढा यासह हिंगोली तालुक्यांतील 200 पेक्षा अधिक गावांना या भूकंपाच्या धक्क्याने हादरे बसले. या भूकंपामुळे अद्याप कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.

error: Content is protected !!