ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पेटलेली मशाल देशात व महाराष्ट्रात क्रांतीची नवी लाट नक्कीचं निर्माण करणारं.गणेश बिल्लार युवासेना उप तालुका अधिकारी

उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पेटलेली मशाल देशात व महाराष्ट्रात क्रांतीची नवी लाट नक्कीचं निर्माण करणारं.गणेश बिल्लार युवासेना उप तालुका अधिकारी

मंडणगड प्रतिनिधी

माणसाच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं संघर्ष किती असावा? एखाद्या मोठया राजकीय पक्षाच्या नेत्याचे आयुष्य किती अव्हानात्मक असावं? किती राजकीय संकटाला सामोरे जाणारा प्रवास असावा? नेतृत्वाची, संघटना बांधणीची अग्निपरीक्षा किती वेळा द्यावी लागणार असावी? इतका कसा कोणाचा राजकीय प्रवास खडतर असावा? किती घाव वैद्यकीय आणि स्वकीय सोसावे लागणार आहेत हेचं खर मला समजत नाही म्हणुन, आज मला लिहावस वाटलं मा. मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब.
संपुर्ण जगावर कोरोनाचे संकट आल्यावर महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या साध्या सरळ व्यक्तिमत्वातून आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी राज्यात आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडवून, जनतेचे प्राण वाचवणारा योद्धा मुख्यमंत्री पाहिलाय संपुर्ण राज्यातील जनतेने तुम्हांला मा.उध्दवजी.
मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख पद मिळाल्यानंतर जे काय नियतीने त्यांच्या आयुष्यात राजकारणाचे फासे फिरवले ते अत्यंत लक्षणीय आहेत. नेतृत्वाची अग्निपरीक्षा देतं असताना, कुशल संघटना बांधणी करून, पक्षाला सत्तेत आणून सुद्धा फुटीच्या वाळवीने ठाकरेंची साथ अजूनही सोडलेली नाहीचं. त्यावेळी नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे यांच्या समवेत असंख्य लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते, आमदार असे शिवसेना सोडून गेले परंतु आता तर फुटीची लाटचं शिवसेनेत आली असून तब्बल चाळीस आमदार, तेरा खासदार, अनेक नगरसेवक, असंख्य कार्यकर्ते व त्याहून अधिक म्हणजे शिवसेना हे नावं व धनुष्यबाण ही निशाणी सुद्धा मा. पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना गमवावी लागली असून, नेतृत्वाच्या अस्तित्वाची, संघटनेच्या अस्तित्वाची लढाई हा योद्धा आज लढतोय इतकं मात्र प्रामुख्याने संपुर्ण देश बघतोय. हे सगळं घडत असताना केंद्रीय यंत्रणा वापरून सोबत आहेत त्यांना प्रखर त्रास देण्याचे कार्य विरोधकांनमार्फत जोरदार सुरूच आहे. यानंतर पक्षातून फुटलेले बंडखोर बेताल वक्तव्य करत सैरावैरा महाराष्ट्रात बोंबलत फिरत आहेतच. या सगळया घटनांचा विचार केला तर किती उत्तुंग व्यक्तिमत्व, संयमी योद्धा, सुसंस्कारी नेता असे त्रिहेरी संगम नेतृत्व आपल्याला मा.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यात दिसतं आहे. कुटुंबावर आले, पक्षावर आले अगदी शिवसेना भवन व मातोश्रीवर सुद्धा विरोधक बोलण्याचे थांबले नाहीत परंतू या सगळया गोष्टी पाहिल्या तरी ठाकरे व गर्दी हे समीकरण आजवर विरोधक तोडू शकले नाहीत हे वास्तवशाली सत्य स्वीकारावं लागेल विरोधकांना.
केंद्राच्या महाशक्तीने महाराष्ट्रतील चाळीस बंडखोर आमदार सोबत घेऊन शिवसेना पक्ष फोडला व महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेना व ठाकरे हे समीकरण संपविण्यासाठी हे राक्षसी अहंकार असणारे सरकार स्थापन केले गेले. ज्यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या स्वाक्षरीचा ए. बी. फॉर्म घेऊन निवडून आले ते आज त्यांनाच राजकारणाच्या आखाड्यातून संपविण्यासाठी दुर्देवी स्वप्न पाहत आहेत. हे सगळं महाभारत घडल्यानंतर पांडवांनसोबत ठाकरे यांची कोकणातील सभा ही देशातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरली.
मा. आमदार संजयजी कदम यांच्या प्रवेशाचे अवचित्त साधून ठाकरेंची शिवगर्जना खेडच्या गोळीबार मैदानात घुमली व विरोधकांची कोकणातील शिमग्यात होळी लावणारं असे चित्र निर्माण झाले आहे. आपल्या संघटनेवर आलेले हे संकट दूर करण्यासाठी शिवसैनिकांना नवी उमिद व नवी दिशा दर्शवणारी विराट सभा कोकणात ठाकरेनी घेतली असून ठाकरेशैलीत चांगलाच समाचार घेतले असल्याचे राजकीय वातावरण सांगत आहे. कोकणच्या जनतेचे विशेष प्रेम आजवर ठाकरे कुटुंबावर व शिवसेनेवर आपण पाहिले आहे. कोकणातील ०५ मार्च २०२३ ची खेड मधील सभा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या इतिहासात निर्णायक ठरली असल्याचे प्रामुख्याने मला वाटतं आहे.
नवी दिशा, नवी ऊर्जा, नवं संजीवनी, निष्ठा आणि ठाकरेंची प्रतिष्ठा खऱ्या अर्थानं यातून महाराष्ट्राला दिसेल असा विश्वास मला नक्कीच वाटतोय. आताचे महाराष्ट्रतील राजकारण पाहता मा. उद्धवजी ठाकरे यांच्या समवेत असणारे शिवसैनिक हे रसायन किती विरोधकांना भारी पडू शकत हे चांगलेच विरोधकांना माहीत आहे.
काळ अगदीच कसोटीचा आहे, माञ लढण्यास योद्धा तयार आहे.
लढाई जितकी बिकट तितकाच शिवसैनिक तिखट.

||उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पेटलेली मशाल देशात व महाराष्ट्रात क्रांतीची नवी लाट नक्कीचं निर्माण करणारं.||
इतकं नक्की यातून सांगू इच्छितो…श्री. गणेश हनुमंत बिल्लार .युवासेनातालुका उप तालुका अधिकारी मंडणगड .

error: Content is protected !!