ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी

पुणे (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अडचणीत आले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळीच तपास यंत्रणेने पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणेच्या पथकाने बारामती अ‍ॅग्रोची संबंधित एकूण सहा ठिकाणी धाड टाकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. बारामती अॅग्रोवर ईडीने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. बारामती अॅग्रो कंपनी ही आमदार रोहित पवार यांची आहे.

शुक्रवारी सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेने बारामती अॅग्रोवर धाड टाकली आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून बारामती अॅग्रोसह सहा ठिकाणी झाडाझडती केली जात आहे. बारामती अॅग्रो या कंपनीत रोहित पवार हे कार्यकारी संचालक आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार हे अध्यक्ष आहेत. केंद्राचे तपासणी पथक सकाळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासणी सुरु केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हे पथक ईडीचे आहे की कोणत्या दुसऱ्या तपास यंत्रणेचे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

error: Content is protected !!