ब्रेकिंग न्युज
घुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडित

वैभव नाईक एक व्यक्ती म्हणून नाही तर सामान्य शिवसैनिक म्हणून राणेंना आव्हान देतोय

कणकवली : भाजपचे आमदार आमदार निलेश राणे यांचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ, अशी गर्जना शिवसेना पक्षाचे कणकवली मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात शिवसेना- राणे यांच्यात वाद आणखी पेटण्याची चिन्ह दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपाचा दणदणीत विजय झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका करता वैभव नाईक यांना आव्हान दिले होते.राणेंना धक्का देणा-याला दहा जन्म घ्यावे लागतील अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वैभव नाईक हे आमच्याशी आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत. सिंधुदुर्गात राणेंना आव्हान देणारा किंवा धक्का देणा-याला दहा जन्म घ्यावे लागतील असे आव्हान नितेश राणे यांनी शिवसेनेला दिले होते. आमदार निलेश राणे यांनी दिलेले आव्हान स्वीकारून नाईक म्हणाले की, त्यांचे आव्हान आम्ही शिवसैनिक स्वीकारून नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ, असा निर्धार आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ. नारायण राणेंचे आव्हान आम्ही कधीच संपवले. वैभव नाईक एक व्यक्ती म्हणून नाही तर सामान्य शिवसैनिक म्हणून राणेंना आव्हान देऊन २०१४ च्या निवडणुकीत राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केला तर गेल्या निवडणूकीत माझ्या मुळेच नारायण राणेंनी पळ काढला, अशी जोरदार टीका वैभव नाईक यांनी राणेंवर केली.

error: Content is protected !!