ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

गोपतपिंपळगाव – कुक्कडगाव परिसरातल्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला

गोपतपिंपळगाव – कुक्कडगाव परिसरातल्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला

52 कोटीच्या पुलामुळे रहदारीचा मार्ग होणार सुकर – आमदार लक्ष्मण पवार

गेवराई दि. 29  : मतदारसंघातील गोपतपिंपळगाव – कुक्कडगावला जोडणाऱ्या पुलामुळे ग्रामस्थांना उपयोग होऊन, दळणवळणाच्या माध्यमातून आर्थिक उलाढालीला मदत होईल. त्यामुळे, गोदाकाठची महत्त्वपूर्ण गावे एकमेकांना जोडली गेली पाहिजेत, अशी अपेक्षा आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केली आहे. गुरूवार ता. 28 रोजी दु. एक वाजता पुल बांधकामाची पाहणी करताना ते पत्रकारांशी बोलत होते.
गेवराई तालुक्यातील गोपतपिंपळगाव – कुकुडगाव , ही दोन गावे गोदाकाठी
आहेत. बीड – जालना जिल्ह्यातील नागरीकांच्या हितासाठी गोदापात्रात पुल होणे आवश्यक होते. येथील परिसरात असलेल्या गावांनी अनेक वेळा पुल करण्याची
मागणी केली होती. आमदार पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विशेष बाब म्हणून, निधी द्यावा, अशी मागणी करून, त्याचा पाठपुरावा केला. राज्यातील आमदारांनी ग्रामीण भागातील गावांच्या सिमेंट रस्ता कामासाठी निधी मागितला होता. मात्र, आमदार पवार यांनी पुलासाठी निधी मागून, त्याचे महत्व विशेद केले होते. त्यामुळे, या पुलाच्या बांधकामासह इतर बाबींसाठी जवळपास 52 कोटी रु चा निधी मंजूर झाला असून, सदरील कामाला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या एका कंपनीला पुलाचे कंत्राट दिले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत कामाला गती दिली जात आहे. आमदार पवार यांनी, गुरूवारी रखरखत्या उन्हात लोखंडी पीलर व इतर साहित्याची पहाणी करून, कामासंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी, पत्रकारांशी बोलताना आमदार पवार यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून गेवराई व अंबड तालुक्यातील जनतेची मागणी होती. हा पुल अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. गोदापात्राच्या दोन्ही बाजुला मोठ मोठी गावे आहेत. बाजारपेठे आहे. पुलामुळे दळणवळण वाढणार असून, बारमाही जाण्या-येण्यासाठी पुलाचा वापर करता येईल. या आधी, पावसाळ्यात जायची संधी नव्हती. फक्त उन्हाळ्यात जाता येत होते. लवकरच, पुलाचे काम पूर्ण होईल आणि नागरिकांना पुलाचा वापर करून जाता येणार आहे. गेवराई मतदारसंघात रस्ताचे जाळे निर्माण होत असून, त्याचा मनस्वी आनंद असल्याचे ही आ. लक्ष्मण पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे.
यावेळी कल्याणराव तौर,परमेश्वर तौर, सरपच सुधाकर आर्दड,संतोष मस्के,गोपाल चव्हाण, भगवान तौर,लक्ष्मण तौर, गोविंद तौर, पप्पु महाराज, प्रा. येळापुरे, स्वीय सहायक संजय आंधळे, आदी उपस्थित होते गोपतपिंपळगाव येथील कार्यकर्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आ. पवार यांनी रामपुरी येथील स्व. पाटीलबा मस्के यांच्या घरी भेट देऊन मस्के कुटुंबाचे सांत्वन केले आहे

error: Content is protected !!