ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला सुरु केलेल्या सेवा पंधरवड्याची सांगता महात्मा गांधी यांच्या १५३व्या जन्मदिनी आज २ ऑक्टोबरला वर्धा येथे केली.

वर्धा प्रतिनिधी – ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या सेवा पंधरवड्याची सांगता आज वर्धा येथे उपमुख्यमंञी देवेंद्रफडणवीस यांच्याहस्ते केली.
यावेळेस सहकारी-मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलजी, सुधीरभाऊ मुनगंटीवार, जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंहजी, खा. रामदासजी तडस, आमदार सर्वश्री डॉ. पंकज भोयर, दादाराव केचे,समीर कुणावार, रामदास अंबटकर तसेच वर्ध्याचे जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी आणि प्रचंड संख्येने वर्ध्यातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला सुरु केलेल्या सेवा पंधरवड्याची सांगता महात्मा गांधी यांच्या १५३व्या जन्मदिनी आज २ ऑक्टोबरला वर्धा येथे केली

या 15 दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्यातल्या तब्बल 2,50,000 नागरिकांना सेवा पुरवण्याचे काम वर्धा प्रशासनाने केले.
या पंधरवड्याच्या सांगता दिनानिमित्ताने काही उपक्रमांना सुरुवात केली.

वर्धा जिल्हा पुरवणी गॅझेटियरचे प्रकाशन केले. गॅझेटियरमध्ये जिल्ह्याचा इतिहास, भूगोल असे सगळेच असते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमत्ताने येत्या काळात राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांचे अशा प्रकारचे सुधारीत गॅझेटियर राज्य सरकार प्रकाशित करणार. सुरुवात वर्धा जिल्ह्यापासून झाली.

एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम सुरु केला. ’हॅलो नही, वंदे मातरम् कहीये.’ वंदे मातरम् हा स्वातंत्र्यलढ्याचा मूलमंत्र होता. याच मंत्राने बंगालची फाळणी हाणून पाडली. भगतसिंह फाशीवर गेले तर त्यांनी ‘वंदे मातरम्’ म्हटले.

कोट्यवधी लोकांना ज्या मंत्राने भुरळ पाडली ते ‘वंदे मातरम्’ पुन्हा एकदा आपल्याला आचरणात आणायचे आहे. सुधीरभाऊ यांनी जी ही चळवळ सुरु केली आहे, त्या अभियानाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी होत असल्याचा मला अतिशय आनंद आहे.असे मत उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर लोकांमध्ये राष्ट्रवादाच्या भावनेची पेरणी आवश्यकच आहे. या कार्याला ‘वंदे मातरम्’ अभियान बळ देईल. गुलामगिरीच्या सगळ्या शृंखला आपल्याला तोडून टाकायच्या आहेत. गुलामगिरी ज्यात दिसते त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याज्य आहेत.

पुन्हा एकदा तीच उर्जा, तीच प्रेरणा ‘वंदे मातरम’च्या माध्यमातून मिळेल असा विश्वास मला आहे.’चला नदीला जावुया’ अंतर्गत 75 नदी परिक्रमा या अभियानाचाही शुभारंभ करताना मनस्वी आनंद झाला .महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांच्या आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या चित्रकला प्रदर्शनालाही भेट दिली. व उपस्थित बांधवाना उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.

error: Content is protected !!