ब्रेकिंग न्युज
पंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागरसंत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजनलिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीपंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंतमादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साह

रांगोळीचा सडा, फुलांची उधळण करून भारत जोडो यात्रेचे स्वागत* *राहुलजी गांधींना भेटण्यासाठी गावखेडी भल्या पहाटे सज्ज

 

जलंब, (जिल्हा बुलढाणा) दि. 19 :
सात वर्षाची चिमुरडी कोमल राजीव साठे, शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून कडाक्याच्या थंडीत उठून कामाला लागली होती. पत्रे बांधून बनवलेल्या छोट्याशा घराच्या अंगणात साफसफाई केली. नन्तर दारात सडा टाकून रांगोळी घालण्यात मग्न झाली. तिने “सुस्वागतम भारत जोडो” असे रांगोळीत कोरले होते.

शेगावपासून सहा किलोमीटरवरील खेर्डी (ता. खामगाव) या छोट्याशा खेडेगावात प्रत्येक दारात अशा सुबक रांगोळ्या कोरल्या होत्या. राहुलजींची भारत जोडो यात्रा याच रस्त्यावरून जाणार हे ऐकून त्या फार खुश होत्या. कोमल, जयश्री साठे, प्रिया उंबरकर या राहुलजींना पाहण्यास, भेटण्यास खूप उत्सुक होत्या. अशाच अनेक रांगोळ्या प्रत्येक घरासमोर दिसत होत्या आणि दारात मुलाबाळांसह फुले घेऊन राहुलजींच्या स्वागतासाठी महिला लहान मुलांसह उभ्या होत्या. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांची प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली होती. सकाळी सहा वाजता पदयात्रेला शेगावच्या बाजार समितीपासून सुरुवात झाली. खेर्डी येथे साडेसातच्या सुमारास यात्रा दाखल झाली. फुलांच्या वर्षावात राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.

जलंब येथे दहा वाजता मोठ्या उत्साहात यात्रेचे स्वागत झाले. येथील शाळेच्या मुलांनी शाळेच्या बाहेर मैदानात स्वागतासाठी मोठी रांग लावली होती. काही ठिकाणी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची वेशभूषा केलेली मुले इतिहासाची आठवण करून देत होते. अभिरा अभय गोंड या तीन वर्षांच्या मुलगी बालशिवाजी वेशभूषा करून तलवारीसह घोड्यावर बसली होती. बाजूला सहा मावळे होते. कॉंग्रेसचे जुने कार्यकर्ते शाळीग्राम कळसकर (वय 86) आपल्या तीन पिढ्यांसह राजकारणात आहेत, ते सहकुटुंब स्वागतासाठी उभे होते. नांदुरा येथील शिवाजी हायस्कुलच्या मुलीचे लेझीम पथक बहारदार होते. तर खामगावच्या रुक्मिणी भजनी मंडळाने विठ्ठल रखुमाई देखाव्यात “बेटी बचाव” भजन सादर करत होत्या. राणा लकी शाळेच्या मुलांनी आदिवासी नृत्य सादर केले होते.

error: Content is protected !!