ब्रेकिंग न्युज
आष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धसबाफना पॉलिमर्स जामखेडचे नाव जागतिक पातळीवरजामखेड शहरात डॉ सुजय विखेंच्या प्रचारासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या काॅर्नर सभाडाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुलेशारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा

म्हाप्रळ आंबेत पुलाचे प्रश्नावर शहर व्यापारी संघटना आक्रमक

म्हाप्रळ आंबेत पुलाचे प्रश्नावर शहर व्यापारी संघटना आक्रमक

मंडणगड प्रतिनिधी दि. 12-

म्हाप्रळ आंबेत पुलाचे संदर्भात शहर व्यापारी संघटना, सार्वजनीक बांधकाम खाते व महसुल प्रश्नासन यांच्या संयुक्त सभेचे 12 जुलै 2023 रोजी तहसिल कार्यालय मंडणगड येथे आयोजन करण्यात आले होते. सभेस बांधकम विभागाचे अधिकारी व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी हजर होते. दुरुस्तीचे कारणाने पुलावरील वाहतूक बंद असल्याने तालुक्याचे आर्थकारण ठप्प असल्याने या प्रश्नावर गेल्या एक वर्षापासून शहर व्यापारी संघटना विविध माध्यमातून आंदोलन व पाठपुरावा करीत आहे. पावसाळ्यात पुल वाहतूकीस खुला होणार असल्याच्या तारखा वेगवेगळ्या माध्यमातून घोषीत होत असल्याने खरी परिस्थिती जाणुन घेण्यासाठी आयोजीत या सभेत अधिकाऱ्यांनी वांरवार तारखा वाढवून मागण्यापेक्षा वेळेत काम करण्याची भुमीका मांडण्यात आली. यावेळी पुढील सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत वाढणार असल्याचे बांधकामचे अधिकाऱ्यांनी सुचीत केले. सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ मागितल्याने व्यापारी संघटनेचे सदस्यांनी या गोष्टीला नकार दिला. तर बांधकाम अधिकारी मुदत मिळावी यासाठी विनवणी करत राहिले. यावेळी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी श्री. वैभव कोकाटे श्री भैय्या कोकाटे यांनी वारंवार मुदत देऊनही काम पुर्ण होत नाही.तर का पुन्हा पुन्हा मुदतवाढ का द्यावी ? मुदत वारंवार देऊन सुद्धा काम होत नसेल तर आपल्याला कामासाठी मुदत देऊन काय उपयोग असे विचारण्यात आले. जी फेरी बोट रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती. ती आता रात्री बारा वाजेपर्यंतच सुरु असते त्यामुळे पर्यटक तसेच तालुक्यातील नागरिकांनी नाहक त्रास होत असल्याने याला जबाबदार कोण ? फेरीबोटचा वेळेत जनतेला न सांगात वांरवार बदल होत असल्याने जनता नाराज झालेली आहे. मंडणगड शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर यांनी अधिकाऱ्यांची ठणकावून कानउघडणी करीत सांगितले की तुम्ही अधिकारी म्हणून कामाचे नाहीत तुम्हाला मंडणगड तालुक्याचं काही घेणेदेणे नाही. अधिकाऱ्यांच्या प्रयोगांचा नाहक त्रास मंडणगड दापोली जनतेला सोसावा लागत आहे. 14 ऑगस्ट 2023 पर्यंत आपण ब्रिज चालू केला नाही आंदोलन करु या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार आपण राहाल. आम्ही 14 तारखेनंतर पर्यंत वाट पाहून यानंतर रस्ता रोको व मोर्चा असे आक्रोश जनतेतून तुम्हाला पाहायला मिळेल. असे यावेळी काटकर यांच्याकडून सांगण्यात आले. सभेस उपाध्यक्ष भैय्या कोकाटे, निलेश गोवळे, विनोद जाधव, मुश्ताक दाभिळकर, प्रविण जाधव आदी व्यापारी उपस्थित होते.

error: Content is protected !!