ब्रेकिंग न्युज
देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरीगेवराई तालुक्याचे धडाडीचे लोकसभा उमेदवार संजयभाऊ काळे यांचा अर्ज प्रशासनाने थोड्या कारणानं बाद केला.शेवगाव तालुका भाजपा महिला मोर्चाच्या  .तालुका अध्यक्ष तथा सरपंच शितल केदार यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकीगेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुचतहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?जि.प.प्राथ.शाळा पोतेवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नगेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटलाडॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी’ने सन्मानित जसपाल नारंग यांचा स्नेह-75 च्यावतीने सत्कारपैठण – रामपुरी बस तलवाडा बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांचे हाल…जिल्ह्यातील जनता हेच माझे वैभव;अग्निपरीक्षेत मी तावून सुलाखून निघाले

बारामती अॅग्रो लि.च्या जय श्रीराम शुगर कारखान्याचा गाळप समारोप समारंभ संपन्न

बारामती अॅग्रो लि.च्या जय श्रीराम शुगर कारखान्याचा गाळप समारोप समारंभ संपन्न

हळगाव कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला – प्राध्यापक मधुकर राळेभात

जामखेड प्रतिनिधी;-ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे मतदार संघातच गाळप व्हावे व तरूणांनाही रोजगार उपलब्ध व्हावा याच हेतूने जामखेड सारख्या माळरानावर उभा राहिलेला जय श्रीराम शुगर हा साखर कारखाना आ. रोहीत पवार यांच्या बारामती अॅग्रो मार्फत विकत घेतल्यानंतर ऊसाची कमतरता असताना तसेच अनेक अडीअडचणींना तोंड देत पहिल्या गाळप हंगामात विक्रमी साडेतीन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून शेतकऱ्यांना २९०० रूपये दर दिला आहे. त्यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फरपट थांबली आहे. पुढील हंगामात दहा हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्याचे उद्दिष्ट असून या भागातील तीनशेच्या आसपास युवकांना रोजगार देण्याबाबत आ. पवार आग्रही असल्याचे प्रतिपादन जय श्रीराम शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले.

यावेळी प्रा मधुकर राळेभात म्हणाले, शेतकऱ्यांना रिकव्हरीनुसार पेमेंट द्यावे.जामखेड तालुक्याची शेती ही उतावळी आहे.त्यामुळे इतरांपेक्षा येथे पिक उत्पादनाला कमी दिवस लागतात.म्हणून शेतकऱ्यांचा ऊस दहा महिने पूर्ण झाले की,कारखान्याला घेवून जावा. आ. रोहित पवार यांनी हळगाव येथील साखर कारखाना विकत घेतला असून हळगाव कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, संचालक सुधिर राळेभात, सुरेश भोसले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

आ. रोहित पवार यांच्या जामखेड तालुक्यातील हळगाव येथील बारामती ॲग्रो लि. जय श्रीराम शुगर हळगाव युनिट नंबर तीन गाळप हंगाम २०२३-२४ सांगता कार्यक्रम समारंभ गुरुवार दि.२८ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला.

यावेळी बारामती ॲग्रो चे व्हा. चेअरमन सुभाष गुळवे, व्हाईस प्रेसिडेंट के.एन. निंबे, मिलिंद देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, दत्तात्रय वारे, नरेंद्र जाधव, माजी सभापती सुधीर राळेभात, कैलास वराट, सुंदरदास बिरंगळ,प्रशांत राळेभात, मदन लेकूरवाळे, माजी सभापती दीपक पवार पाटील, बिभीषण परकड, विठ्ठल चव्हाण, संतोष निरगुडे,सरपंच सुनिल उबाळे, निलेश पवार, रामहरी गोपाळघरे,सुशेन ढवळे, अमर चाऊस, सह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!