ब्रेकिंग न्युज
आळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकरआम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवले

देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान १७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरी

देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे २८ जूनला प्रस्थान
१७ जुलै ला आषाढ एकादशी होणार साजरी

पुणे आळंदी  : आषाढी पायी वारी करिता शुक्रवार ( ता.२८ ) जुन रोजी दुपारी २ वाजता संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर श्रीक्षेत्र देहूगाव येथून ,जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.तर मंगळवार ( ता.१६) जुलैला पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. जेष्ठ आषाढ शुद्ध एकादशी बुधवार ( ता. १७) जुलै ते जेष्ठ आषाढ शुद्ध गुरू पौर्णिमा रविवार ( ता.२१) जुलै रोजी दुपार पर्यंत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा संत तुकाराम महाराज संस्थान मंदिर ( नवीन इमारत ) प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी मुक्कामी राहणार असल्याचे देहू देवस्थान संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख, अध्यक्ष आणि विश्वस्त यांनी दिली.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळा प्रस्थानचे संपूर्ण कार्यक्रमाची माहिती आणि पत्रिकेचे प्रकाशन प्रकाशन श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात हरिनाम गजरात करण्यात आले. या प्रसंगी पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर नाना पेठ पुणे येथून मंगळवार ( ता.२ ) जुलै रोजी पालखी निघाल्या नंतर रात्रीचा मुक्काम लोणी काळभोर येथे नेहमीच्या ठिकाणी न करता लोणी काळभोर कदम वाक वस्ती येथील नवीन पालखी तळावर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामास राहणार आहे. लोणी काळभोर च्या ग्रामस्थांच्या मान्यतेने हा एकच बदल करण्यात आला असल्याचे पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी सांगितले.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पालखी रथाच्या पुढे २६ दिंड्या राहणार आहेत. पालखी रथाच्या मागे माघील वर्षी ३०३ दिंड्या होत्या. यावर्षी रथाच्या मागे ६६ दिंड्या वाढल्याने ३६९ दिंड्याची संख्या झाली आहे. यामुळे सोहळा अधिक वाढला आहे. ६६ दिंड्या वाढल्या असून, कोकणातील एक दिंडी वगळता बाकी ,मराठवाडा, विदर्भ या भागातील दिंड्या वाढल्या आहेत.
श्री संत तुकाराम महाराज देहू देवस्थानच्या वतीने पंढरपूर येथील मुख्य मंदिरा पासून अर्धा किलोमीटर अंतरावर श्री संत तुकाराम महाराज मंदिर विकसित करण्यात आले आहे. या मंदिरात १७ मार्च रोजी वैदिक पद्धतीने श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ,संत तुकाराम महाराज मंदिर ( नवीन इमारत ) प्रदक्षिणा मार्ग ,पंढरपूर येथे मुक्काम करणार असून रविवार ( ता.२१ ) जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथून परतीचा प्रवास सुरु होईल.
शुक्रवार ( ता.२८ जून ) श्री संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी सोहळा श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरातून दुपारी २ वाजता प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यातील पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम इनामदार साहेब वाडा ( संत तुकाराम महाराज यांचे आजोळ ) येथे होईल. शनिवार ( ता.२९) रोजी सकाळी पालखी सोहळा देहू नगरीतून मार्गस्थ होऊन आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामास राहील. रविवार ( ता. ३० जून ) रोजी आकुर्डी येथून पालखी सोहळा मार्गस्थ होऊन संध्याकाळी निवडुंगा विठ्ठल मंदिर नाना पेठ पुणे येथे दोन दिवस मुक्कामास राहणार आहे. सोमवार ( ता.१ जुलै ) रोजी देखील पालखी सोहळा संपूर्ण दिवस आणि रात्रीचा मुक्काम याच ठिकाणी मुक्कामास राहणार आहे.
मंगळवार ( ता.२) जुलै रोजी श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथून या सोहळ्याचे प्रस्थान होऊन लोणी काळभोर येथील कदम वाक वस्ती या नवीन पालखी तळावर पालखी सोहळा मुक्काम करणार आहे. बुधवार ( ता.३) जुलै रोजी पालखी सोहळा लोणी काळभोर येथून पुढील टप्पा म्हणजे यवत येथील पालखी तळा वरील श्री भैरवनाथ मंदिरात मुक्कामास राहील. गुरुवार ( ता.४ जुलै ) रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत येथून मार्गस्थ झाल्यानंतर वरवंड येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे. शुक्रवार ( ता.५) जुलैला वरवंड येथील मुक्कामा नंतर पालखी सोहळा ऊंडवडी गवळ्याची येथील पालखी तळावर मुक्काम करील. शनिवार ( ता.६) जुलैला उंडवडी गवळ्याची येथून सकाळी पालखी सोहळा प्रस्थान करेल आणि रात्रीच्या मुक्कामासाठी बारामती येथील शारदा विद्यालयाच्या प्रांगणात पोचेल. रविवार ( ता.७ ) जुलै रोजी बारामती येथून पालखी सोहळा प्रस्थान करून पुढे रात्री सणसर येथील पालखी तळावर मुक्काम करील. सोमवार ( ता.८) जुलै रोजी पालखी सोहळा प्रस्थान करून पुढे अंथुर्णे येथील पालखी तळावर मुक्कामास राहील. मंगळवार ( ता.९ ) जुलैला पालखी अंथुर्णे येथून सकाळी मार्गस्थ होईल आणि रात्री निमगाव केतकी येथे पालखी तळावर मुक्काम करील. बुधवार ( ता.१०) निमगाव केतकी येथून सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर दुपारच्या मुक्कामात इंदापूर येथे गोल रिंगण सोहळा संपन्न झाल्या नंतर पालखी सोहळा याच ठिकाणी इंदापूर येथे पालखी तळावर मुक्काम करणार आहे. गुरुवार ( ता.११) रोजी पालखी इंदापूर येथील मुक्कामा नंतर सकाळी पालखी सोहळा प्रस्थान करील,आणि सराठी येथील पालखी तळावर रात्रीचा मुक्काम घेईल. शुक्रवार ( ता.१२) सराठी येथे नीरा स्नान करून अकलूज येथील माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण करून अकलूज माने विद्यालय येथील पालखी तळावर पालखी मुक्काम करील.शनिवार (ता.१३) जुलैला सकाळी पालखी सोहळ्याचे अकलूज येथून सकाळी प्रस्थान होईल. माळीनगर येथे उभे रिंगण खेळून पुढे बोरगाव येथे पालखी तळावर मुक्काम करणार आहे. रविवार ( १४ ) बोरगाव / श्रीपुर पालखी तलावरून सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ होऊन पिराची कुरोली येथील गायरानातील पालखी तळावर मुक्काम करील. सोमवार ( ता.१५) पिराची कुरोली येथून पालखी सोहळा मार्गस्थ होऊन बाजीराव विहीर येथील चौथे विश्रांतीच्या ठिकाणी उभे रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा वाखरी येथे पालखी तळावर रात्रीच्या मुक्कामासाठी दाखल होणार आहे. मंगळवार ( ता.१६ जुलै ) रोजी सकाळी वाखरी येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने हरिनाम गजरात वाटचाल सुरू करील. त्या ठिकाणी तिसऱ्या विश्रांतीत पादुका आरती होऊन गोल रिंगण होईल. त्या नंतर पालखी सोहळा रात्रीच्या मुक्कामासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत तुकाराम महाराज मंदिर ( नवीन इमारत ) या ठिकाणी विसावणार आहे. बुधवार ( ता.१६ ) ते रविवार ( ता.२१ ) जुलैच्या दुपार पर्यंत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिर ( नवी इमारत ) येथे राहणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे यांनी सांगितले.

error: Content is protected !!