ब्रेकिंग न्युज
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवडजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून पांढरवाडी येथील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्याचे आदेशपंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावलेदंड शाही संपवण्यासाठी बजरंग सोनवणेला साथ घ्यावी-खुर्शीदआलमसौ.के.एस.के.महाविद्यालयात  मानवी साखळी तयार करून  मतदान जनजागृतीमिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजराकालभैरवनाथ महाराज – खंडोबा महाराज उत्सवाचे कुरुळीत आयोजनयुवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- बजरंग बप्पा सोनवणेबाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवेबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडे

फ्री व्हाईस ग्रुपच्या मॅरेथॉनमध्ये बाभळगाव महाविद्यालयाच्या मुलींचे यश

फ्री व्हाईस ग्रुपच्या मॅरेथॉनमध्ये बाभळगाव महाविद्यालयाच्या मुलींचे यश
बाभळगाव ;  दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव या महाविद्यालयाच्या खेळाडूनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने फ्री व्हाईस ग्रुप, लातूरच्या वतीने भीम फेस्टिवल – २०२४ मध्ये ” Run for opportunity, Run for equality ”  या शीर्षकाखा आयोजित करण्यात  आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये  गुणानुक्रमे  चौधरी अंजली सचिन- प्रथम,  आडे सोनी व्यंकट – द्वितीय आणि पेठे आरती भगवान – तृतीय यांनी क्रमांक मिळवून यावर्षीच्या फ्री व्हाईस मॅरेथॉन – २०२४ ट्रॉफीवर महाविद्यालयाचे नाव कोरले आहे.
              शहरातील दयानंद सभागृहामध्ये झालेल्या भीम फेस्टिवलच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये डॉ. विजय अजनीकर, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, डी. एस. नरसिंगे,  ॲड.राजकुमार गंडले यांच्या उपस्थितीमध्ये रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन विजय खेळाडूंचाविजय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
               या यशाबद्दल दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ बाभळगाव, अध्यक्ष आ. धीरज देशमुख, सचिव शाम देशमुख, प्राचार्य डॉ. कटारे, क्रीडा संचालक डॉ. वैशाली माढेकर, स्टाफ सचिव जयदेवी पवार, बाळासाहेब देशमुख, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!